________________
२३६ : आराधना कथाकोष पुण्यउदय जाहाल्यावरि । म्हणे हे पतिदेहे पेटारी । हे जाळोनिया झडकरि । सुखमंदिरि भोग भोगू ।।५९।। राया ऐका हो त्या राणिन । तिर्यंच देह दग्ध करून । भ्रतार केला पुण्यपावन । सुदेवदर्शन पाप गेले ॥६॥ तैसे करीत होते राया । कुतपि पळाले भेवोनिया । कैचा जप कैचि क्रिया । नरदेह वाया गमाविला ॥६१॥ ते ऐकोनि प्रीयोत्तर । राया न सुचे प्रत्युत्तर । क्रोधानीळ डोश अंतर । मौन्य वक्त्र राहिला ॥६२॥ यानंतरे एके दिवसि । राव गेला वनक्रीडे सि । तेथे पाहिले आतापन ऋषी । कायोत्सर्गेसी मौन्य ।।६३।। पंचाग्नि साधि मुनिराय । कृश जाहालि त्याहाची काय । तपतेजे जैसा का सूर्य । मेरुवत् धीर ज्यापरि ॥६४।। ऐसा यशोधर तो मुनि । दुरोनि देखियला नयनि । चेलना गुरू ओळखोनि । हृदयी अग्नि धडाडिला ॥६५॥ क्रोध उद्भवला दारूण । खड्ग सज्ज केले त्यान । म्हने ह्यास टाकावे मारोन । मिथ्यांधनयन तद्वत ।।६६।। जे स्वामीचा क्रोध करिति । ते अंतःकाळि दु:खी होति । परजन्मौ नर्कप्राप्ती । भोग भोगिती पापाचे ॥६७।। ऐसे न करावे भव्यजन । स्वामि कृपा संपादून । शक्तिसार भक्ति करून । पुण्यपावन भवभवि ॥६८॥ तेव्हा राजा काय करित । स्वान चेतविली पंचशत । ते धावली जैसी भुत । वक्त्र विकसित भयंकर ॥६९॥ ते धावत आलि स्वामिपासी । पुण्य अतिशय तयासी । वैरभावनिवृत्ती कुकरासी । विपरित्येसी प्रदक्षिणा ||७०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org