________________
प्रसंग अठरावा : २३५ दिन दिन वृद्धी होत । उभयता श्रुतवृत्तान्त । कर्मकरणी अघटित । परि वचन सत्य करावे ॥४७॥ उपवर जाली दोध जन । लग्न केली आनंदान । निसीमध्ये पंचदिन । सुखसंपन्न भोगिती ॥४८॥ रात्रौ मनइच्छा सुखभोग । दिवसा होतसे भुजंग । पेटारीत घालोनि वेग । कर्मसंयोग विचरती ॥४९।। कृतकर्म न सोडि जीवा । पूर्व जन्माचा जैसा ठेवा । ऐसे जानोनि धर्म आचरावा । सखा करावा देवगुरू ॥५०॥ एकदा समुद्रदत्तान । कन्या पाहली म्लानवदन । हे पुत्री तुजकारण । दुःक्ख दारुण भ्रताराचे ॥५१॥ अरेरे विघातिया नष्टा । काय लिहिले रे अदृष्टा । मम कन्यारूप श्रेष्ठा । भोगिति ती कष्टा अनिवार ॥५२॥ माता करितसे रुदन । कन्या धैर्यवंत सगुण । माय त्वा सोक न करन । धीर धरने जननीय ॥५३॥ माता गेलि स्वगृहासि । सांगति जालि भ्रतारासि । कन्या दुःखी निजमानसि । गति कैसि करावि वो ॥५४॥ तेव्हा पिता समुद्रदत्त । गेला पाहू ज्यामातात । रात्रौ दिव्यस्वरूप अत्यंत । दिवसासि होत विखारी ॥५५॥ ते पाहोनिया नजर । मनामध्ये करि विचार ।। गुरूमुखे ऐकिले शास्त्र । पुण्ये संहार सर्व पाप ।।५६।। बाई काही नेम ध्यावा । पापाचा नाश होईल तेव्हा । देव गुरु हृदयी धरावा । जेणे विसावा जीवासि ।।५७।। गुरूपासी नेम घेवोन । दर्शनं पापनाशनं । ऐसे करिता एक दिन । बुद्धि उत्पन्न जाहाली ॥५८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org