SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 259
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २३४ : आराधना - कथाकोष नित्य विष्णुपदि असावे । येथे गमन त्याचे न व्हावे । इंद्रपदि सुख भोगावे । उपकारास्तव यत्न केला ||३५|| यदर्थी राया व्हावे निश्चित । राग न धरावा मनात । तुम्हा सांगते एक दृष्टांत | कथा हृदयात धरावी ॥३६॥ वत्स देश महाविख्यात । कौसंबि नगरि असे त्यात । प्रजापाळ राजा असे तेथ । राज्य करित पूर्वपुण्ये ॥ ३७ ॥ त्या ग्रामी एक पुण्यवान । सागरदत्त गुणनिधान । तयाची रमणी षड्गुण । असे संपूर्ण शीलवंती ||३८|| तेथेचि एक पुण्यश्लोक । समुद्रदत्त असे भाविक । सप्तगुणि तो असे श्रावक । नित्यनेमिक गुरुभक्ती ||३९|| त्याची भार्या समुद्रदत्ता । रूपलावण्यगुणवंता । धर्मशील भाग्यवंता । सौख्या आतौता काळकर्मी ॥४०॥ एके दिवसि चौघे जन | जिनचर्चा आनंदान | ते वसईमधे येवोन । करिति भाषण एकमेका ॥४१॥ विनोदपन गोष्टी सांगती । तुम्हा आम्हा होय संतति । कन्या अथवा पुत्रप्राप्ती । होता जुगति विवाह करू ॥४२॥ ऐसी भाक दोघा जाली । परस्पर प्रीति उपजली । कित्येक दिवसा गर्भिणी जालि । संतत वाढली प्रपंचाचि ॥४३॥ सागरदत्तासि पुत्र जाला । वसुमित्र नाम तयाला । पूर्व कर्माचा भोग त्याला । भोगन आल जन्मताचि ||४४ || रात्रौ जन्म जाला पुत्र । दिवसा भुजंग विखार ! ऐसे राया कर्मसूत्र । जिवासि फेर चौह्यांशी ॥४५॥ तथा समुद्रदत्तासी । कन्या झालि गुणराशि | नागदत्ता नाम तयासी । स्वरूपे जैसी सुरकन्या ॥४६॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy