________________
प्रसंग अठरावा : २३३
तो धर्म अंगिकारावा । बौध्य गुरू चीत्ति धरावा । उभयता ऐक्यभाव व्हावा । संयोग करावा रतिकामा ॥२३॥ तुम्ही आम्ही सौख्य भोगन । देवगुरुगुणनिधान । ऐसे ऐकोनिया वचन । देवि म्हने जिनधर्म श्रेष्ठ ॥२४॥ श्लोक:- नास्ति अर्हतात्परो देवो । धर्मो नास्ति दयापरः ।
तप नास्ति निग्रंथं एते सम्यक्त्वलक्षणाः ॥२५।। टीका- अरहंतपरता नाही देव । नी:प्रपंचि गुरुराव ।
नीहाँसीक शास्त्रवैभव । हे लाघव तुम्हा नेनवे ॥२६॥ ऐकोनि राज्ञिचे उत्तर । नृपा न सुचे प्रत्युत्तर । जानोनि चेलना मनोहर । स्वकीय भ्रतार मन रक्षि ॥२७॥ आर्जवगुण जाने राणी । धर्मवैभव दशलक्षणी । विष्टगु ज्ञान किंचितकर्नी । त्वं गुरुनय निदर्शीन ॥२८॥ तदा एकदा बौध्यगुरु । भोजनार्थ केला आदरू । अमंत्रन मडपयोरु । भागवतादरू पंचशत ।।२९।। ते येवोनि मंडपा आतौती । ध्यान धरोनि बसले चित्ति । कपटी षड्मिथ्यामति । चेलना म्हणति हे काय ॥३०॥ ते ऐकोनि एक शिष्ये । म्हणे गेले विष्णुसभेस । अज एकादसी दिवस । वैकुंठास सर्वहि गेले ॥३१॥ तेव्हा चेलना करि विचार । देहे भस्म करू अपवित्र । अग्नि आनिता ते समग्र । पळाले त्वरे वायसापरी ॥३२॥ राव बोले क्रोधे करून । त्यास देवोनि आमंत्रण । मंडपात करिसि दहन । दुःख दारुण मम गुरुसी ॥३३।। तदा राज्ञी म्हने राया । अपवित्र देहे टाकोनिया। विष्णुपदी सुख भोगाया । चिरकाळ त्या ठाया असावे ॥३४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org