________________
तत्समयी तो भूपाळ | नेत्री पाहोनि पुष्पफळ । थोर हर्षला हृत्कमळ | घेवोनि तात्काळ स्वकरि ||३१|| मग घालोनिया वदनि । भक्षण करिता तत्क्षणि । महामधुर अमृताहूनि । संतोष मनि फार दाटला ||३२|| तदा म्हने वो ब्रह्मचारि । फळ रसाळ महामाधुरि ।
प्रसंग सतरावा : २२७
आनिले कोठुनि निर्धारि । वदावे वैखरी मज लागि ||३३|| तद्वाक्य ऐकोनि व्यंतर । वदता झाला सत्वर
1
म्हने राया सागरी थोर । दीपावर मम मठ असे ||३४|| मम मठाचिय सन्निध । वाटिका असति शुद्ध । पुष्पफले नानाविध । मिष्ट सुगंध फार व्यापिला ||३५|| जसे स्वर्गीचे कल्पवृक्ष । मन विच्छिदापिति दानदक्ष तैसे फळ असति विनावृक्ष । अमृतापेक्षा फार मिष्ट || ३६ || जरी फळ भक्षाव्याकारन | प्रवर्त्तले असे तव मन ।
तरी चालावे शीघ्र येथून । मी नेइन तुज त्या स्थळ ||३७|| तद्वाक्य ऐकोनि नरेश्वर । जिह्वालंपट लालचि थोर । चालिला त्याचियाबरोबर | नेनति विचार शुभाशुभ ||३८|| लवनाब्धि' नेवोनि चक्रधर । प्रगटला तो व्यंतर ।
नृपासि वदे दुर्वाक्य थोर । स्वरूप भयंकर करोनिया ||३९|| रे रे दुष्ट पापीष्टा । आचारहीना व्रत भ्रष्ट्रा ।
क्रोधे करोनि वरीष्टा । मम कष्टात पावविले ||४०||
तव मंदिरि मी जान । स्वयपाक होतो विजयसेन | उष्ण क्षीर प्रभावे करोन । क्रोधे मज जाळोन मारिले रे ॥४१॥
८. लवण समुद्र.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org