________________
२२८ : आराधना कथाकोष
तदा मरोनि क्षीरसागरि । व्यंतर झालो बलाढय थोरि । तुजबू डवीन या सागरि । परम वैरी मम तू असे ॥४२॥ ऐसे वदोनि तो देव । करिता झाला महोपद्रव । बुडवू लागला दुष्ट भाव । तदा तो राव विचारि हृदयि ॥४३॥ अहो पंच नमस्कार निर्मल । तयाचे मज असे बल । काय करील हा कस्मल । त्रैलोक्य बल न पूरति ॥४४॥ मग दृढ करोनि मन । अपराजित मंत्र पुण्यवान। मनोवाक्काय दृढ करोन । पंचगुरू स्मरण करितसे ॥४५॥ तदा तो व्यंतर देव । चित्ति धरोनि कुभाव । बुडउ पाहे षट्खंडराव । परंतु क्वचिदुपाव चालेचि ना ||४६।। अहो तो ब्रह्मदत्त भूपाल । त्रिकर्ण मंत्र स्मरि सबल । सागराचे अगाध जल । ते स्थलसम जाहाले ॥४७|| मंत्रराज प्रभावे करोनि । पापिष्ट जीव मरोनि । उत्पन्न होय स्वर्गभुवनि । फार वदोनि काय वृथा ॥४८॥ नृप वैरी आनि चौर । सिंहाग्नि आनि गैवर । पीडा करिति फार । ते होति दूर मंत्रप्रभावे ॥४९॥ मंत्रप्रभाव पाहोनि ऐसे । म्हने आता करावे कैसे। उपाय विचारि मानसे । वचन भासे नृपाप्रति ॥५०॥ जरी आइकसि मद्वचन । तरी सूटसि मजपासून । न तरि घेइन तव प्राण । निश्चय करोन जानिजे ॥५१॥ तद्वाक्य एकोनि चक्रि । भयभीत होवोनि थोरी । कंप सुटला सर्वशरीरि । महद्भय धरि मरणाचे ॥५२॥
९. भूभि.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org