________________
२२६ : आराधना कथाकोष
तदा आसनादिक मांडून । त्वरे पाचारिले नृपालागुन । स्वर्णथालि क्षीर घालून । त्वरे आणून ठेविलि ॥२०॥ चक्रवर्ती होता क्षुधावंत । त्वरे क्षीर घालिताचि मुखात । असह्य जाहले नृपात । थोर दुःखित झाला भूपति ||२१|| उदरि पेटलि क्षुधा अग्नि । उष्ण पायस' जळति वदनि । हृदयी प्रजळिला क्रोधाग्नि । तदा अंतःकरणी विचारिति ॥ २२॥ उठोनिया एके सरि । क्षीरभाजन धरोनि करि । रिचविलि तयाचे सिरि । रागससापरि' उष्ण थोर ॥२३॥ तत्क्षणि तो सूपकार" | पंचत्व' पावला सत्वर । क्षीराब्धिरत्न द्वीपावर । जाहला व्यंतर देवकुळि ||२४|| तदा विभंगावधिकरोनि । प्राग्भव दुर्मृत्यु जानुनि । हृदयी पेटलि क्रोधाग्नि । म्हने चक्रिने मजलागुनि मारिले ||२५|| तेव्हा होतो मी निर्बळ । चक्रवर्ती होता सबळ | पद सेविति खगभूपाल । सुर नर सकल निसिदिन ||२६|| चौन्यांशी लक्ष गयवर । तितुकेचि रथ सुंदर ।
अष्टादश कोटि तुरंग थोर । पाद चार कोटि छाण्णव ॥ २७॥ देव विद्याधर करोनि । षड्विध भोगिति आवनि' । नव निधान नानाविध लक्षुमी । पुण्य करोनि भोगि तो ॥ २८ ॥ हृदयी करोनि विचार । परिव्राजक रूप धरोनि थोर । पुष्पफळ घेवोनि प्रचुर । महामधुर सुधातुल्य ॥ २९ ॥ जावोनि चक्रीचिय पुढे । फल ठेविले रसाळ गाढे । शीघ्र बोले लाडे कोडे । भाषण गाढे करितसे ॥ ३० ॥
२. क्षीर, ३. कथिल, ४. स्वैपाक्या, ५. मृत्यु, ६. पृथ्वी, ७. अमृत,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org