________________
३२० : आराधना-कथाकोषं
ऐसे पन साधोनि मंत्रिमंदिरि । शीघ्र जावोनिया रात्री | कुशल असे एकांतसूत्रि । वदे मंत्रिप्रति तदा ॥५७॥ त्वा जिनमार्गि काय पाहिले । म्हनोनि बौधमत वजिले । त्वत्कुलागत चालीत आले । जगि विसरिले थोर प्रताप ॥५८॥ प्रधान वदे हो वंदक । एकचित्ते मदुक्ति आइक । महदाश्चर्य पाहुनि एक । जिनधर्मं सात्विक ग्राहिले ॥५९॥ त्वा आश्चर्य पाहिले कैसे । ते मजपुढे सांगावे सरसे । कळो येईल भर्वसे । सोनार जैसे स्वर्ण पाखिति ॥ ६० ॥ तदा वदे तो प्रधान । नृप आनि मी दोघे जण । माहालावर बैसलो होतो जान । दिशावलोकन करीत होतो ॥ ६१ ॥ तत्क्षणि आकाशमार्गी । चालिले होते चारणयोगी । नृपाने पाहोनि उठोनि वेगि । मुनिपंकजालागि वंदिले ॥६२॥ मग पाहोनि नृपभक्ति । शीघ्र येवोनि चास्न यती । प्रत्यक्षदर्शन देवोनि क्षिति । योग्यस्थानाप्रति बैसले ||६३॥ लवलाहे तो नृपवर । कृत साष्टांग नमस्कार । मग उठोनि जोडोनि कर । तद्गुणसार फार वर्णिले || ६४ || गद्गद् वाक्य करोनि भूपति । स्वात्मनिंदा फार करिति । पिपलपत्त्रवत् काय कंपति । धर्मे करोन क्षिति भिजली ॥ ६५॥ तदा मुनींद्र कृपावंत । नृपभक्ति पाहोनि त्वरित । व्रत नेम देवोनि तयात । पद शाश्वतमार्गि लाविले ॥६६॥ मुनींद्राश्चर्य पाहोनि थोर । म्या केला जिनधर्मांगीकार । सांडिला अधर्मं पापभार । केवल द्वार दुर्गतीचे ॥६७॥ तदुक्ति ऐकोनि वंदक म्हने । इंद्रजाल दाखवोनि नृपाने । ठगिले रे तुजकारने । कंचि गति गगने मानवाचि ॥ ६८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org