________________
प्रसंग सोळावा २१९
तदुपदेसे अधर्मासि । आचरीतो दिवानिशि । निर्दोष जानोनि मद्यमांसासि । भक्षितो पापासि न जानता । ४६ । तू दिससि दयाचा निधान । मज करावे पावन । त्वरे जिनमार्गि लाउन । घोर दुक्खातून काढिजे ॥४७॥ मुनि वदे तू आहेस भव्य । परंतु अनानदशाभावे । मिथ्यात्व आचरिले जीवे । यथांधकूपि साटवे अंध ॥४८|| आता मिथ्यात्व करोनि दूर | जिनधर्म करी अंगीकार । जेन्हे तरसि संसारसागर । अजरामर पद पावसी ॥ ४९ ॥ स्वामि म्या सोडिले मिथ्यामत । तुझे चरनि जडली प्रीत | आता शीघ्र तारावे मत । करावा अंत संसृतीचा ||४९ || तदा प्रधानोक्ति आइकुन । गृहीधर्मव्रत नेम देउन । गगनमार्गे केले गमन । मुनि चारन दयानिधि ॥५०॥ मंत्र साधर्मे जानोनि भूपति । थोरानंद पावला चित्ति । तयाचि प्रशंसा करिति । नाना भाति करोनिया ॥ ५१ ॥
अहो सम्यक्त्व नृपवर । केवल दयाचा सागर । जिनधर्मावरि प्रीति थोर । प्रताप थोर धरावरि ॥ ५२ ॥ तदा कवने एके दिनि । वंदक वदे भक्तादिलागुनि । फार दिवस मम सदनि । काय म्हनोनि प्रधान न ये ॥ ५३ ॥ सेवक वदति सद्गुरू स्वामि । प्रधान जाहाला जैनधर्मी । म्हनोनि न ये आपुले धामि । ऐसे आम्हि कणि ऐकिले ॥५४॥ ऐकोनि भक्ताहिचि उक्ति । बंदक विचार करिति चित्ति । म्हने आता कवने रिति । प्रधानाप्रति संबोधिजे ॥ ५५ ॥
मजप्रति असे महाज्ञान । नाना दृष्टान्त देउन । जिनमत करोनि उच्छापन । लावीन प्रधान बौधमार्गि ॥५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org