________________
२१६ : आराधना - कथाकोष
तदा नृप पश्यता गंगनि । दृष्टि देखिले चारणमुनि । महदाश्चर्य मानुनि मनि । कर जोडुनि नमस्कारिले ॥१०॥ तदा संघश्री वदे गा राया । लवलाहे उठोनिया । कवनाचे लागलासि पाया | मनवचकाया भाव शुद्ध ॥ ११ ॥ ऐकोनि मंत्रीचे वचन । नृपति वदे त्याकारण ।
चालिले असति मुनि चारण । उठोनि गगनि शीघ्र पाहि ॥ १२ ॥ तदाकाश पाहिता सत्वर । पाहिले युग्म मुनीश्वर । येत असति समोर । पुण्य प्रचुर नृपाचे दिसे ||१३|| येवोनि बैसले योग्य स्थानि । तदा नृप प्रधान मिळोनि । उत्कृष्ट भक्ति करोनि । नमस्कार मुनि चर्णासि केले || १४ || मग मस्तक जोडोनि कर । स्तुति करिति नृपवर ।
स्वामी आज पाप गेले दूर । पळोनि तस्कर निशांति जैसे || १५ ॥ स्वामी मी निज सेवक जाणून । अपूर्व दिधले दर्शन । दरीद्रयागृही चिंतामणिरत्न । कल्पवृक्षापनचि तिष्टले ||१६|| अनंतभवि संसारसागरि । दुःख भोगिले म्या भारी । तव दर्शन होताच सत्वरि । गेले दूर पळोनिया ॥ १७॥ भानुउदय होताचि सत्वर । पळोनिया जाय निशांधकार । तैसे तुझे दर्शने प्रचुर । मिथ्यात्व तस्कर नाश पावले ॥ १८ ॥ देवानंत संसारसागरि । म्या दुःख भोगिले थोरी । चौ-यशी लक्षौनि खानि च्यारी । ते दुःख दूरि आज गेले ॥ १९॥ हे अष्टकर्म अति दुर्जन । भवभवि दुःख देति दारुण । ते न सोसवे मजकुन । सांगितो गान्हान तुजपुढे ||२०|| स्वाभी मी बुडता संसारसागरि । धर्मोपदेश देवोनि उद्धरि । मिळवावे सौख्य सागरि । पूर्ण करि मन्मनोरथ ॥ २१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org