________________
प्रसंग सोळावा : २१७
।
I
नृप वाक्यौकोन जेष्ट मुनि । म्हने राया ऐकावे श्रवनि । चित्त स्थिर करोनि तुम्ही । द्विधाधर्म कणि आइका ॥२२॥ अनादि निधन संसारसागर । केवळ दुःखाचा डोंगर । I भरोनि जात असे पूर । जीवरासि जलचर त्यामाजी ॥ २३ ॥ तेथे षट्काय जीवरासी । पडोनि कर्माचिय फासि । भोगिति दुःखाचिया रासी । थोर पापासि जोडिति ॥ २४ ॥ महामिथ्यात्व करोनि प्राणि । दुःख भोगिति नाना योनि । एक्या सम्यक्त्वावाचुनि । घोरार्णव प्राणि तरेचि ना ॥ २५ ॥ नृपति वदे सद्गुरु राया । मिथ्यात्व वदावे कासिया । ते सांगावे कृपा करोनिया । जेन्हे सौख्य माझिया जिवा होय । २६ । राया त्वा केलास प्रश्न । आइक एकाग्रचित्त करोन । मिथ्यामत आणि सम्यक्त्वरत्न | याचे वर्णन पृथक्विध ||२७|| एकांत मत बोधाचे । विनयमत तापसाचे |
विपरीत जानावे द्विजाचे । विपरीत मार्गि प्रवर्तिले ॥ २८ ॥ सेवडाचे संसयमत । संशय धरिति मनात । सदैव करिति जीवघात । अज्ञानमत तुरकाचे ॥२९॥ मांसभक्षण करिति बोध । तयासि वदति शुद्ध । जिनमार्गासि करिति विरुद्ध । पापबुद्ध नित्य प्रति ॥ ३० ॥
जे नित्य मद्यमांस भक्षिति । तो निश्चय स्वभ्रदुःख भोगिति । त्याचे वर्णन कोन करिति । केवलज्ञान शक्तिवाचोनि ॥३१॥ छेदन भेदन ताप ताडन । वैतर्न्यादि शूलारोपन ।
वैरि करिति दुःख दारुण । त्याचे वर्णन करावे काय ||३२|| तदुःख भोगोनि दुराचारी । भवाटविमाजि भ्रमण करी । अनंत काळ संसारसागरि । भरोभरि दुःख भोगिति ॥ ३३ ॥
।
I
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org