________________
प्रसंग सोळावा अथ धनदत्त-नृपति-कथा
श्रीपंचपरमगुरु । पदी मम नमस्कारु । ते संसारसागरी तारु । ग्रंथारभि आधारु मज ॥१॥ माय माझी सरस्वती । जे अज्ञानतिमिर हरती। सेवका देतसे शुभ मती । तत्पदि नुति सदा मम ॥२॥ नमस्कार प्रसादे करोनि । धनदत्त नृपाची कथनि । सांगेन सभेलागुनि । जिन्हे जिनशासनि विश्वास घडे ॥३॥ अंध्र देशामाजि सार । धान्यपुर असे नगर । धर्मकर्माचे आगर । श्रावकजन फार वसति ॥४॥ त्या नगरीचा भूप । धनदत्त असे निष्पाप । सम्यक्त्वालंकृत कामरूप । मोडिति व्याप मिथ्यात्वाचा ॥५॥ संघश्री तयाचा प्रधान । बोधमती असे जान । एकांतमताचे अभिमान । सदैव धरून असे राहिला ॥६॥ जिनमि रत असे भूपति । प्रधान असे एकांतमति । परंतु नृपाज्ञा सदैव पालिति । राज्य चालविति चतुरपने ॥७॥ कवने एके दिवसि । नृप बैसला होता आकासी । पाचारोनि प्रधानासि । एकमेकासि वाक्य वदति ॥८॥ वार्ता करिता दोघे जण । काल जाहला अपराह्न । महदानंद पावले मन । हास्यविनोदे करोन उभय ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org