________________
२१० : आराधना - कथाकोब
तयाचि सोमा भार्या नाम । गुणवंत धीर्यो उत्तम । तया दोघासि पुत्र उत्तम । बाळ सुक्षम उद्भवला ||४५॥ तया नाम सोमकुवर । दिवसदिवस जाला उपवर । तव तो कित्यका वासर । सुमुद्रदत्ता मैत्र जाला ||४६ || तौ द्वौ मैत्र खेळति बरे । बाळक्रीडा परस्परे । दोघे शोभति मणोहार । हर्ष अंतर मातापिता ||४७ || ऐसे करिता कित्येक दिन । एकावसरि तो गोपायन । पापोद्भव तयाचे मन । कुबुधि उत्पन्न जाहाली ||४८|| दोघे लेकुर खेळ खेळत । आलि तयाचे मंदिरात | सुवर्णालंकार शोभत । समुद्रदत्त बाळ सुकुमाळ ||४९|| तया दोघा देतसे खोबर । लह्या आनि कसाकर । नेले ते आत्तरमंदिर । सर्वाळिकार काढितसे ॥५०॥ बाळ करितसे रूदन । पापि निर्दय त्याचे मन । बाळमुखि बोळा घालून । सर्व घेवोनिया भूषण । त्यास वरवंट्यान ठेसिले ॥५१॥
अपल्या बाळादेखत । त्याला टाकिले लादनित । तृण टाकोनिया वरून । पापि तो गुप्त राहिला ॥५२॥
I
इकडे मातापिता घरि । बाळ न दिसे झाली घाबरी | पृच्छा करिताती शेजारी । कैसी कोन परि जाहाली ॥५३॥ जैसा पुण्यहीन प्राणि । सुख मिळेना त्रिभुवनी | धावत जातसे कोक । कपर्दक पाणि न लभे ॥ ५४ ॥ तेवि तो सागरदत्त वाणि । समग्रग्राम पाहे नयनी । पुसतसे मायबहिनि । मत्पुत्र नयनि पाहिला काय ॥५५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org