________________
प्रसंग पंधरावा : २०९
पुण्यकीर्ती करोनिया । सन्मान होतसे सभालया। पुण्य धन धान्य होय तया । लक्ष्मी प्रियावंत होतसे ॥३३॥ या लोकिच होय कीर्ति । परलोकि इन्द्राचि संपत्ति । दिव्यसुख भोग भोगीताति । अनुक्रम जाति मोक्षासी ॥३४।। इति कथाकोष कुसंग । करिति त्यासी दोषदाघ । म्हणोन करावा सुसंग । पुढती प्रसंग ऐकावा ॥३५॥ वंदना करोनि भगवंता । कथा होइन सांगता । सावधान व्हावे श्रोता । दृष्टांतकथा आयकावि ॥३६॥ कौशंबि विशाळ नगरी । राजा जयपाळ राज्य करी । रहितीचा प्रतिपाळ पुत्रापरि । एणप्रकारी धर्मवंत ॥३७॥ पुण्यप्रभावे राजमंदिरी । जयावति तयाचि अस्त्री । सुख भोगिति नानापरि । सहपरिवारि पुत्रपौत्र ॥३८॥ तेथेच एक धर्मवंत । श्रेष्ठि नाम सागरदत्त । पूर्वपुण्य धनाढयवंत । तो शीळवंत धर्मस्तंभ ॥३९|| तयाचि स्त्री सागरदत्ता । रूपलावण्यगुणवंता । धर्मशीळप्रतिव्रता । दया समता सर्वाभूती ॥४०॥ तत् द्वयो उभयतासी । पुत्र जाला तयाचे वंसि । पुनोत्छव द्वादशदिवसी । नाम त्यासी समुद्रदत्त ॥४१॥ रूपलावण्य सकुमाळ । बाळ लिळा खेळे बाळ । माता पिता नेत्रकमळ । हृदयकमळ संतुष्ट ॥४२॥ समुद्रदत्त प्रौढ जाला । रासबिदि खेळू लागला। बोल बोले बोबड्या बोला । मायबापाला हर्ष हृदी ॥४३॥ तत्रैव नगराऽतौतामधी । गोपायन वणिक् कुधी। सप्तव्यसनी पापी कुबुधी । देहव्याधी धनवर्जित ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org