________________
२०८ : आराधना कथाकोष
उपासादी केले नेम मनी । तीर्थयात्र नीछे करोन । मग प्रायश्चित्त घेवोन । तूल्य तूर्यसंघभोजन शेक्तीसार ॥२२॥ ज्ञाती भोजनही केले । गोत गंगेत नाहले। कुसंगदोष पाप गेले । सुख पावले संसारी ॥२३॥ या कारण भव्य जीव । कुसंगसंग करन । ज्याचि असती सप्तव्यसन । त्यासी मैत्रीपण न करावे ॥२४॥ न करावा चौर व्यापार । ज्यारण मारण पाप थोर । असत्य न वदावे वक्त्र । हिंसा अतिचार तयासी ॥२५॥ ऐसे न करावे जीव मना । सखा करावा त्रैलोक्यराणा । चित्ति धरावे श्रीतीर्थराणा । मना सज्जना हेची करि ॥२६॥ करी गुरुची नित्य सेवा । संत मेत्र सदा करावा । सुधभाव आसो द्यावा । जेणे विसावा भवभवी ॥२७॥ सुबुधी धरावी मनात । सुकीर्ती वाढवि जनात । जेन होय आत्महितात । तेची चित्तात धरी जीवा ।।२८।। मैत्र करावा गुरुराय । नित्य ध्यावे व्याहाचे पाय । संसारी तारु तोची होय । पुण्याची सोय दाखवितो ॥२९॥ काव्यश्लोक । श्रीमज्जैनपदाब्जयुग्मरसिक भव्यालिभिः साधुभिः । कर्तव्या सह संगतिः सुनितरां त्यक्त्वा कुसंगं बुधैः ॥ सन्मानं धनधान्यमुन्नतपदं प्रीति सतां सर्वदा। या लोकेऽत्र करोति संगतिरसौ सा मे क्रियान्मंगलम् ॥३०॥ टीका । संगत करावि साधुची । ईच्छा पोर्ण होय मनाची। भक्ति करावि जिनदेवाचि । कुळधर्माची चाल चाली ॥३१॥ कुसंग न करावा कल्पांती । जेणे होय महा अपकीर्ति । कर्तव्य शुभसंगति । तेने शुभ कीर्ती जगात ॥३२॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org