________________
प्रसंग पंधरावा : २११
आक्रोश करितसे फार । नेत्री वाहत असे नीर | ते पाहोनिया समग्र । करिति गहिवर नरनारी ॥५६॥ बाई त्याच्या पाई पैंजन | वाळे रुप्याचे शोभायमान । कानि कुडक्या जोड घालून । भीकबाळि कान शोभतो ||५७ || ऐसा बाळ माझा रूपवंत । कंठि गळ्यामध्ये शोभत । कटि कटिसूत्र दिसत । शोभीवंत बाळक माझे ॥५८॥
I
1
आता मी कोन्हीकडे पाहू | कवने वनांतरा जाउ । सागरदत्तासि बोलाउ | कवनसि समजाउ बाई गे || ५९ || शोक आक्रोश करिति फार । तव जाले दोन वासर । गोपायन सेटिचा पुत्र । सोमकुवर मइत्र त्याचा ॥६०॥ तो खेळत आला त्या गृहासी | माता पुसे त्या लेकुरासी । अमचे बाळ तुझ्या घरासी । खेळायासी आले काय रे || ६१ || तेव्हाच त्यासि जालि तर्क । आमचे घरि तुमचे बाळक । अमि खेळ खेळकू | दिले एक बेक बाबान ॥६२॥ गुळखोबर त्याला दिलं । मले उग तबत म्हणाले । त्याचे कुलक कालुन घेतले । बोबडे बोल समजनाची ||६३|| शांत होवोनिया ते माय । बाळकासि पुसे लवलाहे । आरे सख्या तो कोठे आहे । कवण्या ठाय देखिल त्वा ॥ ६४॥ बाळ बोले बालेचाचरी । तला दातवितो मादे गरि । लातनीत बतला पइनावलि । तला लोकली दातवितो || ६५ ॥ मातेचे हृदय स्फुटल । पीत्याचे मन दुःखड जाल । बाळकास करि धरील । आलिंगन केले त्या बाळासी ॥६६॥ धीर धरिला अवघे जनी । लेकरू भेईल म्हणोनि । तयामागे गृहा जावोनि । मौन्य धरोनि पछताती ॥६७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org