________________
१९२ : आराधना-कथाकोब
पूजा सुगंध अष्ट प्रकार । नाना वाद्याचा होतसे गजर । श्रावक मिळाले अपार । जैजैकारं आघनाशनं ॥ १५२ ॥ प्रथमतालि श्रीजिनराज । तयातळि सद्गुरुराज । तिसऱ्यात अर्जिकाविराज । तुर्यात साजे सावकीनि ॥ १५३ ॥ पट्कुलादि षोडशाभरणा । सोभति जैस्या देवांगना । कोकिलास्वर मंगळ गायना । मार्गप्रभावना नेकविद्ध || १५४ ॥ पंडित श्रावक ज्ञानवंत । टाळ वीणा मृदंग सहित । सदास्वर गायन करित । गंधर्व नाचात नाचति ।। १५५ ।। धूपदहन दशगंध | अष्टदिशा न माय सुगंध । उविळा राज्ञिसि महानंद । जैकार शब्दाकाश गर्जे ॥ १५६ ॥ इत्यादि शोभा महासुंदर । उविला राज्ञि हर्षनिर्भर । बौद्धदासि पाहोनि अंतर | सवतमत्सर उद्भवला ॥१५७॥ क्रोध संचरला हृदयात । वदे पूतिगंधरायात ।
अग्रे चालवावा मम रथ । तन्हीच प्रीत आम्हा तुम्हा || १५८॥ ऐकता कामासक्त भूप । कुधर्मि प्रवर्तिला नृप । वदे प्रिये न करि कोप । सांगसि ते समीप देइन || १५९ || कामांध जाले नर । त्यास न कळे सारासार । आर्कदुग्ध आनि गौक्षिर। सम परि अंतर बहुत्येक ॥ १६० ॥ तेवि उविळा महाराज्ञि । सम्यक्त्ववंत शिरोमणि । ऐकता रायाचि करनि । प्रतिज्ञा मनि करितसे ॥ १६९ ॥ मम रथ पत्तनाभीतरि । प्रथम मिरवे सहपरिवारि । अन्न उदक घेइन तरि । ना तुर्यप्रकारि निवृत्ति असे ॥ १६२॥ ऐसा निश्चय करोनिया । त्वरित निघालि तेथोनिया । क्षेत्रियागुंफेस जावोनिया । श्रीसद्गुरूराया पाहिले ॥ १६३॥
I
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org