________________
प्रसंग तेरावा : १८७
मग तेथोनि वज्रकुमार । सैन्यसहित निघाला त्वर । स्वधामास आला गजर । श्री दिवाकर देव देखिला ॥ ९२ ॥ तेव्हा वज्रकुमारान । मातापितास केले नमन । वधुवरासि आसिर्वचन | देऊन मन संतोसले ॥९३॥ तेव्हा कवने एके दिवसि । प्रतापि पाहोनि पुत्रासि । सुख दुःख सांगे तयासि । ऐकोनि मानसि क्षोभिला || १४ || सैन्यसहित सिद्ध जाला । मातापितासहित निघाला । अमरावती नगरासि आला | घाव घातलानि निशानि ॥ ९५ ॥ तेथे संग्राम माजला थोर । प्रज्ञप्तिविद्येचे बळ फार । क्षणात जिंकिला खगेंद्र । दिव पुरंदर वस्य केला ॥९६॥ समस्त राज्यभार घेवोनि । महा महोछव करोनि । राज्यपदि पिता स्थापुनि । संतोश मनि जाहाला ॥ ९७॥ पूर्व पुण्य परिपाक । सत्पुत्र प्राप्त कुळदीपक ।
1
भोग भोगति सर्वसुख । सुभकीर्ति अनेक विस्तारलि ||१८||
एकदा खगपति जयश्रि । पुत्र प्रतापि राज्य करि । सन्मान देखोनि अंतरि । कोप धरि मनामध्ये ॥ ९९ ॥ म्हने मजसि पुत्र होइल । त्यास राज्य कैसे मिळेल । याचाच पगडा पडेल | कवनाचे मूल न कळे काहि ॥ १०० ॥ त्याचा द्वेष करि सदा । बोले दुष्ट कठोर शब्दा | त्याचि न धरि मर्यादा । ऐसि प्रमदा पापिनि ते ।। १०१ ।। माताशब्द कटुक श्रुति । पुत्र म्हने पितियाप्रति । भो भो तात खगपति । मम उत्पत्ति सत्य सांगा ॥ १०२॥ विद्याधर वदे रे बाळा | हे काय वदसि रे सुकुमाला । मी पिता असता जवळा । कठिन कुशला का वदसि ॥ १०३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org