________________
१८८ । आराधना कथाकोष हे तो असे सत्यवार्ता । जो प्रतिपाळि तोचि पिता । सत्यासत्य सांगावे आता । न सांगता मी अन्न न घे ॥१०४॥ निश्चय ऐकोनि तयाचा । खगेंद्र वदे सत्यवाचा । सांगे वृत्तान्त नाभिगिरिचा । मज पूर्विचा नसे व्यक्त ॥१०५॥ ते ऐकताचि सर्व मात । हृदइ जाहाला विरक्त । विमानि बैसला त्वरित । आकाशपंथ चालला ॥१०६॥ पिता बंधु समवेत । मथुरानगरिचे वनात । क्षेत्रियाख्य नामे गुंफेत । मुनिश्वर तेथ पाहिले ।।१०७॥ इंद्रचंद्रनरेंद्र स्वय । पूजा करिति पदद्वय । तपतेजस्वी मुनिराय । पाप जाय दर्शनमात्र ॥१०८।। पाहोनि सद्गुरूरायासि । नमोस्तु त्रिवार चरणासि । त्रीपरित्य पंचांगेसि । विनयभक्तिसि करिति ते ॥१०९|| सद्धर्मवृद्धीचा अर्थ । ऐकोनिया तो समस्त । योग्यस्थानि बैसोनिया स्वस्थ । अनंद चित्तात न समाये ॥११०॥ सोमदत्तगुरू अग्र । धर्म ऐकिला समग्र । मग पुसोनि कुमारचरित्र । मुनिन सर्वत्र सांगितले ॥११॥ ऐकोनि विपरित वार्ता । कुमर म्हणे ऐक ताता । धिग् संसार दुःखकर्ता । दिक्षा त्वरिता द्यावि मज ॥११२॥ दिवाकर वदे पुत्रराया । मम राज्य गृहान सखया । माते त्वं दिक्षा देवोनिया । करावि माया कुटुंबाचि ॥११२॥ पवनवेगा सुंदर सगुन । नूतन आनलि परनुन । संतति संपत्ति भोगुन । दिक्षा घेन चौथ्याश्रमि ॥११४॥ मग तो म्हने वज्रकुमार । धर्म ताता ऐका विचार । नरदेह अनित्य हा संसार । क्षणभंगुर दिसतसे ॥११५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org