________________
१८६ : आराधनां-कथाकोष तयाचि पुनि महासद्गुनि । चंद्रवदनि मृगलोचनि । सिंहकटि गजगामिनि । पवनवेगा नाम्नी सुंदर ॥८०॥ एकदा ते सुंदर नारि । गेलि हिमवंतपर्वतावरि । विज्ञप्तिविद्या साधन करि । तावत् परि काय जालि ॥८१॥ पवनचक्र आले फिरत । बदरिकंटक नेत्रात । रूपता झाला चित्त चलित । विद्यासिद्धित न पवेचि ॥८२॥ संकटि पडता ते सुंदर । पूर्वपुण्य विघ्नहार । क्रीडा करित वज्रकुमार । पर्वतावर सहज आला ॥८३।। तेथे पाहे सुंदर वेल्हाळा । पीडित असे नेत्रकमळा । यत्ने करोनि करकमळा । न कळता डोळा काढि कंटक ||८४॥ स्थिरचित्त ध्यान बळि । विद्या प्रज्ञप्ति सिद्धि झालि । सर्वकार्य सिद्धि हाता आलि । संतोष पावलि अंतरि ॥८५।। पाहोनिया तो रूपवंत । सुंदरा झालि विकळचित्त । मग विचार करि मनात । भ्रतार सत्य हाचि माझा ॥८६॥ याचे गमनयोग करून । प्रज्ञप्तिविद्येचे साधन । यापरता मी नेनअन । सगुन निर्गुन कैसाहि ॥८७॥ हे श्रृत्य झाले तत् पित्यासि । गरुडवेग खगेंद्रासि । अत्यादरे वज्रकुमारासि । आनिले गृहासि तेधवा ॥८८|| पाहोन स्वरूपाचा अब्धि । म्हने मम कन्या सद्बुधी । पुरुषरन गुणनिधि । अनि विद्यासिधि साधलि ॥८९॥ तेव्हा तो गरुडवेग खग । विवाह करि विधिमार्ग । मनात म्हने हा संजोग । पाहोनिया जुग संतोषला ।।९०॥ जामातासि कन्यादान । अनेक-विद्या रत्न धन । चतुरंग सेना अंदन । संतोष मन दिधल त्यासि ॥९१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org