________________
प्रसंग तेरावा । १८५
नाना तीर्थं वंदना करीत । त्यान देखिला नाभिपर्वत । तेथे तपस्वी मुनिश्वरात । भक्तियुक्त नमन केले ॥६८॥ नमोस्तु करिता मुनिराया । बाळक देखिला तया ठाया । स्फुरत्कांति सुंदरतनया । हर्ष हृदया न समावे || ६९ || बाळ देखोनि स्त्रियेसि म्हने । पुत्र नाही अम्हाकारन । यासि घेइ तु त्वरेन । प्रतिपालन करावे याचे ॥७०॥ पाहोनिया त्या बाळकासि । ममता उद्भवलि तिथेसि । करे उचलोनि पोटसि । पुत्रमुखासि चुंबिल ॥७१॥ मुनिसि नमन करूनि । बाळ वो संगि घेवोनि । विमानारूढ खगेंद्रराणी । आले स्वस्थानि आपुल्या ॥ ७२ ॥ विद्याधर खेळवि बाळ । वज्रचिन्ह करि देखिल । वज्रकुमार नाम ठेविल । संतोषविल सज्जनासि ॥७३॥ मातेन टाकिले बाळासि । पूर्वपुण्य तारक त्यासि । विद्याधर खेळविति जयासि । पुण्यवंतासि दुःख कैचे ॥७४॥ दिन दिन बाल वृद्धि करि । बीजेच्या चंद्रापरि । बोबडे बोलाचि प्रीत भारि । सज्जना अंतरि निववी ॥ ७५ ॥ कनकाख्यपुरिचा राजेंद्र । विमलवाहन ज्ञानचंद्र | विद्येचा केवळ समुद्र । वज्रकुमार तत्मातुळ ॥७६॥ तयासमीप जावोनिया । विद्या पठन सांगे तथा । सर्वशास्त्र पढोनिया । झाला ज्ञानिया संपूर्ण ||७७ || आश्चर्यं करिति खगपति । केवळ जेवि बृहस्पति । किंवा वदनि सरस्वति । प्रसन्नमति कीर्तिवंत ॥ ७८ ॥ तेव्हा कोनि एक खगपति । गरूड नामे नृपति । तत्भार्या भगवती सती । शीलवंती गुणमंडित ॥७९॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org