________________
प्रसंग बारावा । १७५
साधूसि संतापिति जे दुष्ट । ते नरकि भोगिति महाकष्ट । भवभवांतर पापीष्ट । फल कनिष्ट भोगिति ॥१८०॥ उक्तंच । साधूनामत्रसंतापकष्टदो भवति ध्रुवं ।
सुष्टु संप्तप्तं यथा तोयं, दहत्यंगं न संशयः ॥ १८२ ॥ आता तरी रे दुर्मति । उपद्रवाचि करावि शांति । जळता रक्षावे मुनीप्रति । थोर पुण्यप्राप्ति होइल तुज ॥१८२॥ मुनिवचन ऐकोनि कणि । गद्गद् वाक्य वदे वदनि । आता मी काय करु जि स्वामि । षंढसमान मी झालो असे ॥ १८३ ॥ 1 सप्तदिनचि राज्यशक्ति । देवोनि बलि प्रधानाप्रति । रणवासि धरिलि वस्ति । नाठवे युक्तिविचार मज ॥ १८४ ॥ देवा हे कार्य करायात । स्वामी तुचि असे समर्थं । फार म्या काय वदावे व्यर्थ । दिवानाथ दीपक यथा ॥ १८५ ॥ आइकोनि रायाचे वचन । विक्रियद्धिप्रतापे करोन ।। ब्राम्हनरूपकृतवामन । वेदोक्ति भाषण करित चालिला || १८६ ॥ वेदध्वनि ऐकोनि बळि । त्वरे येवोनिया जवळि । नमन करोनि पादकमलि । प्रसंसा वेलोवेलि करिति ॥ १८७॥
पुण्यकारण महायज्ञ । काळि आपले झाले येने । आज मी जगि झालो धन्य । सर्वोत्तम घडणे जगि दुर्लभ ॥ १८८॥ थोर पात्र तू भेटला आज । याचना करी जे असे काज । मनविच्छित देईन तुज । स्वामि राजराज्यादिक ॥ १८९ ॥ विष्णुकुमार मुनि तदुक्ति । ऐकोनि वदे बळिप्रति । आशाबद्ध जे बहु मागति । तो याचक दुर्मति जानिजे ॥ १९०॥ उक्तंच । बहू मागता तो जनासी न साहे । न मागे तयाचि रमा दास होये ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org