________________
१७४ : आराधना - कथाकोष
शिष्य वदे जि गुरूराये । जरी असे यासी उपाय ॥ तही मज त्वरे वदावे । सद्योपद्रव दूर होय । महत्पुण्य होय आपनात || १६९ ||
सद्गुरु वदे रे बालका । भूमिभूषण नग असे निका । तेथे विष्णुमुनिनायका । ऋद्धि सात्विका उद्भवलि असे ॥ १७० ॥ वृद्धिबले करोनि सत्वर । विष्णुकुमार मुनिश्वर । शीघ्र उपद्रव करोनि दूर । जय धरनिवर पावला ॥ १७१ ॥ गुरुवाक्य ऐकोनि श्रवणि । त्वरे त्यास्थळि जाउनि । मुनि पंकज बंदोनि । समस्त त्यालागोनि कथिले ॥ १७२ ॥ आइकोनि तयाचि उक्ति । महत्शंका आनिलि चित्ति । वृद्धि उद्भवलि या मजप्रति । तरी प्रचिति पाहु आता ॥ १७३॥ तदा प्रसरिला निज कर । भेदोनिया सर्व भूधर । सागरी जावोनि सत्वर । तज्जलावर स्पर्श केला ॥ १७४ |
मग आवरोनि निजहस्त । विश्वास धरिला चित्तात । म्हने आता जावे त्वरित । धर्मकार्यात संपादावे ॥ १७५ ॥ तदा जावोनि सत्वरि । पावला हस्तनागनगरी । जावोनि पद्मनृपमंदिरि । वदे वैखरि तयाप्रति ॥ १७६ ॥ अहो पद्मबंधुराया । हे कर्म काय आरंभिले त्वया । सद्य नर्कामाजि जाया । दुःख भोगाया परंपरा ॥ १७७॥ राया असे हे आपुले कुल । ताराधीश सम निर्मल । जीवदया पाळोनि सकल | पदाढळ पूर्वजे साधिले ।। १७८।
सुष्ट जनाचे करावे रक्षण । दुष्टाचे करावे खंडन । हे राज्य नीतिचे कारण । साधूप्राणा घेन हे काय रीति ॥ १७९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org