________________
प्रसंग बारावा । १७३ मंत्री तेथे जावोनि त्वरिते । मुनीश्वराहिचे परते । तृणकाष्ठ आनोनि बहुते । कृतदहनाते बाड रचिले ॥१५७॥ नाना जाति पशुयुगल । नानाभाति वस्तु सकल । बृहत्यज्ञाचा मेलविला मेल । नर्कगतिस बल प्राप्त व्हाव्या ।१५८। तदाग्नि लावोनि परति । वैदिक बोलति वेदोक्ति । ब्राम्हन याचका दान देति । पूर्णाहुति टाकिति थोर गजरे ॥१५९॥ धूम्राच्छादिले गगनमंडळ । तदा ते मुनीश्वर सकळ । तत्पूने झाले महत्व्याकुळ । मृत्युकाल दिसे सन्निध ॥१६०॥ प्राणसंकष्ट जानोनि । कृतप्रतिज्ञा सर्वहि मुनि । वाचू जरी या पिडापासुनि । घेनेन्नपाणि न तरि नीवृत्ति ॥१६१॥ द्विधासंन्यास घेवोनि सकल । ध्यानस्थ राहिले अटल । कर्मासि कराव्या निर्बल । मुक्ति स्त्रीजवळ यावया ॥१६२।। आता आइकावे या नंतर । भव्यजन मन करोनि स्थिर । मिथिला नगरीचे बाहिर । वनि श्रुतसागर असे मुनि ॥१६३॥ माध्यान दोन प्रहर रजनि । श्रवण नक्षत्र थोर गगनि । महाकंपीत पाहोनि नयनि । कारण जानोनि शीर डोलविले ।१६४। तदा पुष्पदंत नामे शिष्य । पाहोनि गुरुप्रति पुसे । देवाश्चिर्य पाहिले काय कैसे । मस्तक ऐसे का हालविले ।१६५। तदाश्रुतगार यति । वदे निज शिष्याप्रति । काही बरि न झाली युक्ति । ते तुजप्रति काय सांगू ॥१६६।। गजपुरवनामजि थोर । सप्तशत मुनीश्वर । ध्वान धरिले असे दुर्द्धर । योगनिकर साधिति ॥१६७॥ महामिथ्याति दुष्ट दुर्जन । रायाचे असति प्रधान । मुनीश्वरासि कराया दहन । प्रवर्तीयमान झाले असति ॥१६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org