________________
१७२ : आराधना कथाकोष
वाढवेल करिता विचार । स्मरण जाहाले सत्वर ॥ पूर्वि स्थापिला असे जो वर । तो मागावा नरनायकाप्रति ॥ १४७॥ मग प्रधान जावोनि तत्क्षणि । भूप प्रार्थिला जोडोनि पानि " | तूचि असे सत्योक्त खाणि । त्वत्सम धरणि दुजा नसे || १४८ ||
त्वत्समीप ठेविला जो वर । तो देइजे सत्वर ।
1
न लावीजे उशीर । कार्यप्रक" असे स्वामि ।। १४९ ।। नृपति वदे रे प्रधान । याचना करि निर्भयपन | निर्लोभे सत्वर देइन । परद्रव्य दुर्जन इच्छिति ॥ १५०॥ देवा सप्तदिनाचे राज । हर्षचित्ते देइ जे मज । बरेवाइट करीन जे काज । द्यावे महाराज तद्भय ॥ १५१ ॥ तदा पद्मभूपति म्हने । सप्तदिनाचे राज्य घेणे । चित्ति येइल ते करने । निर्भयपने दिन सप्तक || १५१ ॥ चौघेहि मंति पापरूप । वाक्बंधनि बांधोनि भूप । राज्यी बसौनि पापरूप | मांडिला व्याप दुर्गतिचा ॥ १५२ ॥ प्रधानाप्रति राज्य देउन । रनवासामाजी जाउन । बैसला निश्चित होउन । धर्मध्यान करित असे ॥ १५३ ॥ मग ते राज्य पावोनि थोर । हृदइ करिति विचार । हे वैरि आमचे मुनिश्वर । करावा संव्हार याहाचा || १५४ ॥ कापट्य धरोनि मानसि । रचिते झाले नरमेधासि । पाचारिले बहुविप्रासि । वैदिकासि पढावया ॥ १५५ ॥ अहो तदा ते सर्वहि मुनि । राहिले होते योग्यध्यानि । नित्यकर्म करिति निसिदिनि । अष्टकर्मालागुनि नासावया । १५६ ।
१०. हात, ११. जरूर.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org