________________
प्रसंग बारावा । १७१
तदा नृपति म्हणे गा बरे । त्वद्वर ठेविला भांडारगारे । याचिताचि देइन सत्वरे । मद्वाक्य खरे मानिजे ॥१३६॥ पारका ठेवा जो नर । याचिता न दे जो लवकर । तो पापिष्ट धरणीवर । परद्रव्यअपहार जो करि ।।१३७॥ जो नर नित्य असे दुःखी । तद्व्याधि फेडोन करे जो सुखी। तत्सम सखा नसे त्रिलोकि । तदुपकार मुखी कोन वणि ॥१३८॥ मग चिंतारहित भूपति । निःकंटक राज्य करिति । मंत्रिवरि असे थोर प्रीति । जिनधर्म करिति निसिदिन ॥१३९।। अहो कौन एके दिनि । अकंपनाचार्य मुनि ।। सर्व संघाष्टक मिळोनि । तदुद्यानवनि विहार केले ॥१४०॥ ऐसे ऐकोनि ग्राम जन । महदानंदे करोन । मुनि वंदनेलागुन । कुटुंब मिळोन चालिले ।।१४१।। महद्भक्ति धरोनि हृदि । कृतवंदनात्रिकर्णशुद्धि । पूजन करोनि तत्पदि । शीघ्र धर्मवृद्धि फल पावले ॥१४२।। योग्यस्थानि बैसोनि सर्वे । संबोध' ऐकति निश्चल भावे । स्वर्गमुक्ति होय जेन्हे । पाप जाय पळोनिया ॥१४३॥ कोन्ही जाति कोन्ही येति । वंदन पूजा स्तवन करिति । कोन्ही धर्मोपदेश ऐकति । पुण्यप्रवृत्ती असे वाढलि ॥१४४।। ऐसि महिमा ऐकोनि कणि । प्रधान भयभीत होउनी । विचार करिति निज मनि । पळावे येथुनि शीघ्र आता ॥१४५॥ जिनमार्गि असे हा भूप । आपनकृत मुनि संताप । श्रवणि होताचि करिता कोप । प्राणलोप करील शीघ्र ॥१४६।।
९. धर्मोपदेश.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org