________________
१७० : आराधना-कथाकोष
उक्तंच। चिता चिता दोन्हि सम न मजला भासत असे ।
तन्ही त्यापेक्षाहि अधिक सजना दुस्तर दिसे । चिता निर्जीवात दहन करिता दुःक्ख न वटे ॥
तसी नोहे चिंता सजिव नर ता वह्नि प्रगटे ॥१२५।। नृपोक्ति ऐकोनिया बळि । म्हने मी असता तुझे जवळि । चिंता वहसि प्रबळि । त-ही काजळी लागे मन्मुखि ॥१२६।। स्वामि आज्ञा द्यावी मजप्रति । सिंहबल बलाढय भूपति । बांधोनिया तयाप्रति । धरोनि दुष्टमति आनिन ॥१२७।। तदुक्ति आइकोनि नरेश । आज्ञा दिधलि बलिमंत्रीस । महत्सैन्यसहित तयास । वैरी जिंकायास पाठविले ।।१२८॥ नृपाज्ञा घेवोनि सत्वरि । तदा मंत्रि महदाडंबरि । शीघ्र जावोनि तन्नगरि । सर्व चौफेरि वेष्टिलि ॥१२९।। मग युद्ध करोनि तुंबळ । तदुर्ग भंगिले सकल । निर्बल केला भूपाल । जैसे शार्दूल सिंहावरि ॥१३०॥ मग बाहेर निघोनि सत्वर । पळू लागला तो तस्कर । पुष्टे धावोनि सुभट नर । धरोनि पामर दृढ बांधिला ॥१३१।। वैयालागि आनुन । नृपासि केले आर्पण । पूर्वपुण्य करोन जान । जयनिधान पावला ।।१३२।। दुर्घट वस्तु असे जे जगि । ते ते सुकृती नरालागि । प्राप्त होय बैसल्याजागि । किमाश्चर्य आंगि बलाढय असता १३३ वैरि बद्ध पाहोनि भूपति । प्रधानात वदे हर्ष चित्ति । त्वा मागावा शीघ्रगति । ते संतुष्टचित्ति देइन ॥१३४॥ मग नृपासि वदे प्रधान । सध्या वराचे नसे कारण । भांडारगृहि करावे रक्षण । यदा मी मागिन तत्क्षणि देने ॥१३५॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org