________________
प्रसंग बारावा: १६९
नाम स्थान आनि ज्ञाति । उद्योग कारण भूपति । अंतरि धरोनि थोर प्रीति । अमृतोक्ति पुसिले त्याहित ॥११३॥ नृपोक्ति करोनि श्रवन । सर्वहि नृपाकारन । बलिने केले निवेदन । यथायोग्य मनरंजित ।।११४।। नृपाने त्याहाप्रति भले । थोर प्रतापि पाहिले । स्वयं प्रधानपदि स्थापिले । अंतरि पावले महदानंद ॥११५।। अहो तो पद्मभूपति । प्राक्पुण्यफले राज्य करिति ।। वैरिगणाचे मान मदिति । प्रजा पालिति पुत्रभावे ॥११६॥ तदा कवने एके दिवसि । कृश्यशरीरी पाहोनि नृपासि । बलिप्रधान विचारि मानसि । क्वचिद् वेथा यासी उद्भवलि ।११७। तदा वदे बलिप्रधान । मुखचंद्र दिसे का म्लान । कायाकृश्याचे कारण । करी निवेदन सेवकात ॥११८॥ तदा वदे तो नृपवर । अंतरि चिंता उद्भवलि थोर । म्हनोनि कृश्य हे शरीर । मम फार झाले असे ॥११९॥ कुंभपुरीचा भूपति । बलाढय दुर्गामाजि वसति । तो न माने कवनाप्रति । दुष्ट दुर्मति दुराचारी ।।१२०।। निशाचरतुल्य येवोनि निसि । महत्पीडा करी मद्देसी । उद्दाळोनि जनपदासि । लुठोनि द्रव्यासी जाय सत्वरि ॥१२१॥ तो दुर्गबले असे सुभट । ग्रामपुराचि चाले वाट। मम हृदइ थोर कंटक । सल्यवत् कष्ट फार होति ।।१२२॥ म्हणोनि गा चिंतातुर । दुःखाग्नि पेटलि असे थोर । . . . . . . . . . . . । डोंगर जळतसे ।।१२३।। हेचि दौबंल्याचे कारण । तुजप्रति केले निवेदन । न दिसे अग्नि चिंतासमान । करिति दहन सजीव नरा ॥१२४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org