________________
१६६ : आराधना - कथाकोष
नृपाले ऐसे बदोन काढोति दिधले देशातुन |
उत्कृष्ट पापे करोन । थोर दुःख जन या भवि पावति ॥७८॥ मुनिप्रभाव पाहोनि थोर । नग्रजन आणि नृपवर । करिते झाले जयजयकार । आनंद थोर उद्भविला ||७९ || अहो त्या नग्रामाजी किति । जन होते मिथ्यामति । ते झाले शुद्धसम्यक्ति । जेन्हे स्वर्गप्राप्ति होत असे ॥८०॥ ध्यान विसर्जन मुनि । भव्यजनात संबोधुनि । गुरुसन्निध जानुनि | पंकज बंदुनि बैसला ॥ ८१ ॥ पुढे आइकावे भव्यजन | काय झाले असे कथन । ते चौघेहि प्रधान । सन्नि सन्नि तेथोन चालले ॥८२॥ कुरुजांगल देशांतरी थोर । नम्र असे हस्तनाख्यपुर । तत्शोभा वर्णावि कोठवर । जेथे तीर्थंकर उद्भविले ॥८३॥ अहो त्या नगराचा भूपति । पद्मरथ नामे असति । थोर प्रतापे राज्य करिति । राज्यनीति करोनिया || ८४॥ सुष्टजना दिसे दयाळ । दुष्टनिग्रह कराव्या काल । प्रजा पालिति यथा बाल | जिनधर्म उज्वल पालितसे ॥ ८५ ॥ तल्लीन असे गुरुचणि । नित्य शास्त्राइके श्रवणि । जिनधर्माचरिति यत्न करुनि । अहिंसा लक्षणि दयावंत ॥८६॥ तयाचि राज्ञि लक्ष्मीमति । रूपसौभाग्य सोभति । जिनधर्मं पालिति युक्ति । भांडार भरिति पुण्याचे ॥८७॥ स्वामीसेवा आज्ञांकित । समीप वसति सदोदित । रंजविति भ्रताराचे चित्र । भोग भोगित पुण्योदय ॥ ८८ ॥
त्या नृपालागि सार । युग्मपुत्र मनोहर । यथा शशि दिनकर । पद्म इष्णुकुमार नाम असे || ८९ ||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org