________________
प्रसंग बारावा । १६५
तदा येवोनि त्वरित । स्तंभिले चौघाचेहि हस्त । निशा जावोनिया प्रात । सूर्य उदयात पावला ॥६६॥ ग्रामजन ऐसे पाहोनि व्यक्त । भूपति सि जानविलि मात । स्वामि तव मंत्री मुनिश्वरात । कराव्या घात प्रवर्तले ॥६७॥ नृपति येवोनि सत्वर । आश्चिर्य पाहिले थोर । गगनि स्तंभिले पापिष्ट नर । पाहिला मुनिश्वर दृढ ध्यानि ॥६८॥ भूप वदे धिगरे पापीष्ट । आचारहीन क्रियानष्ट । जगी जन्मले महादुष्ट । बुद्धिभ्रष्ट पापरूपि ।।६९।। सामान्यजंतु वाकारण । वध करिति जे दुष्ट जन । न पाहावे त्याहाचे वदन । केवळ निधान दुर्गतीचे ॥७०॥ जे निरापराध जीवाप्रति । हर्ष मानोनि घात करिति । ते प्राणि नित्य दुर्गति । दुःख भोगिति श्रभ्रसागरि ॥७१॥ उक्तंच : मृगमीनसज्जनानां तृणजलसंतोषविहितवृत्तीनां । लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगति ।।७२।। जे त्रैलोक्यामाजि पूजनिक । थोर असति मुनीनायक । तद्वधाचे जे पातक । ते श्रुतिज्ञापक काय वणि ।।७३॥ नृपति वदोनि ऐसे । क्रोधे खवळला मानसे । निजांतरि विचारीतसे । या दुष्टाहिचे कैसे करावे काय ॥७४॥ पूर्वजाचे हातिचे प्रधान । पुन्हा जातिचे हे ब्राह्मण । कैसे मारावे याहा कारण । केवल निधान पातकाचे ॥७५।। ऐसे विचारोनि अंतरि । काढोनि दिल्हे ग्रामाबाहेरि । स्वार करोनि रासभावरि । अपिष्टा थोरि करोनिया ॥७६॥ त्याहात आज्ञा दिधलि ऐसी । तुम्ही न राहावे या देसी । निघोन जावे परदेशासि । न तरि दु:खासि प्राप्ति घडे ॥७७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org