________________
१६४ : आराधना-कथाकोष
गुरुवाक्य ऐकोनि ऐसे । सर्वांगे दुःखित होवोनि भासे । जेह्ने करोनि पातक नासे । सांगावे ऐसे गुरुराया ॥५४॥ "जरी तू जावोनि वादस्थानि । तिष्टशील ध्यान धरोनि । उपद्रव साहसील रयनि । तरी पापाहोनि सुटशील" ॥५५॥ "जेन्हे घडे अभयदान । पातकाचि होईल हान । अभयदानासमान दान । त्रिलोकि आनखिन दुजे नसे" ॥५६॥ श्रवण करोन सद्गुरुवाणि । थोर आनंद पावला मनि । त्वरे जावोनि वादस्थानि । उभे राहुनि ध्यान धरिले ॥५७॥ रायाचे समक्षे करोन । मानभंग पावले प्रधान । मृत्युप्राय दुःख पाउन । पापचिंतन करू लागले ॥५८॥ चौघे मिळोनिया चित्ति । नानाविध विचार करिति । क्रोध प्रजलला हृदयांति । पडलि भ्रांति पातकाचि ॥५९।। वदति आता जावोनि वनि । माध्यान दोन प्रहर रजनि । खड्गे सर्वे वधावे मुनि । पुन्हा या ग्रामि येतीच ना ॥६०।। तीक्ष्ण खड्ग घेवोनि करि । माध्यान निशा दोन प्रहरि । निघोनिया नग्राबाहेरि । वादस्थानि सत्वरि पातले ॥६॥ तेथे ध्यानस्थ यथा मेर । अडोल पाहोनि श्रुतसागर । येन्हे वादे करोनि गवार । मानभंग थोर केला आमचा ॥६२॥ आता शीघ्र मारावे यासि । प्रयोजन काय सर्वाहिसि । वृथा वधावे मुनीसि । तन्ही पापरासि होइल ॥६३।। तदा होवोनि चौफेरि । खड्ग घेवोनि निजकरि । टाकिते झाले एकेसरि । मुनिमस्तकावरि दुर्जन ॥६४॥ तत्पुण्यमहात्मे करोन । ग्रामदेवताचे आसन । थोर झाले कंपायमान । जानितले कारण ज्ञानबले ॥६५॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org
Jain Education International