________________
प्रसंग बारावा : १६३
जरी ज्ञान असते याहासि तरी वदते नृपासि । मूर्ख लज्जित होवोनि मानसि । म्हनोनि मौन्यासि धरिले ॥ ४२ ॥ ऐसि निंदा करोनि फार । तेथोनि चालिले सत्वर । ग्रामातुन येता मुनिश्वर । नामे श्रुतसागर पाहिला ||४३|| समीपर्वात त्यासी पाहुन । वदति निदाहास्य वचन । सर्वामाजि बलिवद्द नूतन दिसे चौकन थूलकाया ||४४ || जावोनिया ग्रामांतरि । भिक्षा मागोनि घरोघर । कुक्षि भरोनि सत्वरि । कळपामाझारि जात असे ||४५ ॥ हास्यवाक्य ऐकोनि थोर । नयमार्गि असे चतुर । सर्वास जिंकोनि सत्वर । पावला जयकार जैनमार्गि ॥४६॥ क्षुल्लक जैन वादि होउन । थोर आनंदले तयाचे मन । शीघ्र गुरुसन्निध जाउन । केले नमन गुरुपंकजि ॥४७॥ मिथ्यावादि जिंकिले म्हणोनि । गुरुप्रति कथितो तत्क्षणि । त्वत्पादप्रसादे करोनि स्वामि । जय पावोनि आलो असे ||४८ || तव आज्ञा घेवोनि सार । ग्रामांतरि जावोनि सत्वर । घेवोनिया शुद्ध आहार । नग्राबाहिर निघालो त्वरे ॥ ४९ ॥ तेथे चवधे द्विज भेटले । मत पाहोनिया भले । फार टवाळ करू लागले । क्रोध उद्भविले फार मज ॥५०॥ महत् वादिष्ट दुर्मति । देव गुरु निंद्या फार करिति ।
1
ते असह्य झाले मजप्रति । तदा वादे त्याहाप्रति जिंकिले ॥ ५१॥ तद्वाक्य ऐकोनि श्रवणि । अकंपनाचार्य महामुनि || वदते झाले वचनि । शिष्यालागुनि ज्ञानबले ॥५२॥
""
बा रे त्वया वाइट केले । थोर पातक मिळविले । स्वहस्ते संघाष्टक वधिले । ऐसे घडले आज तू जा " ॥ ५३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org