________________
प्रसंग अकरावा । १५७ हृदि वैराग्य पावोनि थोर । सांडोनि स्त्रिया राज्यभार । घेवोनिया दिक्षाभार । तपाचार घोर करिसि ॥१६७|| स्वाधीन असे जयाचे मन । त्यासि त्रिलोकि काय नून । चतुर्णिकाय देव येऊन । करिति पूजन तत्पदि ॥१६८॥ स्वामी मी असो जन्मांध । त्वया दिधले व्रत शुद्ध । ते म्या होवोनि निर्बुद्ध । केले अशुद्ध म्या पापिया ॥१६९।। देवा मत्सम या जनि । पापिष्ट नसे त्रिभुवनि । भोगाया नाना पापयोनि । केवल खानि दुःख रासि ।।१७०।। सोमिल्या जे मम नारि । एकाक्षि असोनि तिजवरि । मम प्रीति असे थोरि । कुर्कुरिवरि स्वान जैसे ||१७१॥ स्वामि म्या द्वादश वत्सर । तपाचरिले जे थोर । ते गमाविले म्या गवार । त्रिलोकि सार पूजनिक ||१७२॥ आता कृपा करोनि मजवरि । स्वामि प्रायश्चित्त द्याव्य लौकरि । बुडतो मी भवसागरि । धरोनि धर्मकरि काढी मज ॥१७३॥ तदा वारिसेन मुनि । तत्करूण वाक्य ऐकोनि । वदता झाला त्यालागुनि । अमृतवाणि सौख्यदायी ॥१७४॥ · अहो असो ज्ञानवंता । खेद न करि निजचित्ता। कर्मवैरि जगि गांजता । पंडितासी मूर्खता येतसे ॥१७५॥ सुधासम वाक्य वदोन । स्थीर केले तयाचे मन । पुन्हा प्रायश्चित्त देउन । व्रतस्थापन केले दृढ ॥१७६।। वारीसेन मुनिने भले । सुस्थिति अंगासि पालिले । जगि पूजनिक झाले । बुडता राखिले पुष्पडाल ।।१७७।। सुस्थितिअंग पालि जो नर । अस्थि रासि करि स्थीर । धर्ममागि लावि सत्वर । तोचि भ्रतार मुक्तिचा ।।१७८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org