________________
प्रसंग अकरावा : १४९
उत्कृष्ट प्रीति होति याजवर । यासी द्यावया राज्यभार । मम मनि विच्छा होति फार । कैसा हा तस्कर निवटिला ॥५६॥ ऐसे विचारोनि नरेश । तराला दिधला उपदेश । म्हने जावोनि श्मशानास । पापीष्टास मारा त्वरे ॥५७॥ मम भय न धरावे तुम्हि । सिर छेदावे शीघ्र जाउनि । न दाखवावा मम लोचनि । ऐसा पापिष्ट जनी नसावा ॥५८।। नृपाज्ञा घेवोनि किंकर । स्मशानी जावोनि सत्वर । खङ्ग उचलिले एकवार । तन्मस्तकावर टाकिले ॥५९। तदा तो पुण्यवान वारिसेन । धर्मध्यानि असे मग्न । पाहावया आले नगरजन । म्हणति याज मरण कैसे आले ॥६०॥ वारिसेनाचे मस्तकावर । खड्ग टाकिता राजकिंकर । तत्क्षणि झाला पुष्पहार । सुगंध चौफेर व्यापिला ॥६१॥ भ्रमर करिति गुंजारव । जयजयकार करिति देव । करिति पुष्पवर्षाव । नानाविध उत्सव करिति जन ॥६२।। पहा हो पुण्यमहिमान । खड्ग हार झाला जान । तीवाग्नि होय जीवन । पुण्यकरुणा जाना जगी ॥६३॥ पुण्यवान नराचे गळा । सर्प क्षेपिता विक्राळा । सुगंधमय होति पुष्पमाळा । जानावा जिव्हाळा जिनधर्माचा १६४। ऐसे जानोनि भव्य प्राणी । रत असावे श्रीजिनधर्मी । दानपूजावतनेमध्यानी । असावे प्राणी भव्यज ॥६५॥ ग्रामजन आणि सुरासुर । सर्व करिति जयजयकार । वाद्य वाजति अपार । आनंद थोर हृदी न मावे ॥६६॥ जन वदति धन्य वारिसेन । जैनधर्मी असे लीन । आचरति शुद्ध गृहीधर्म । केवळनिधान पुण्यरासि ॥६७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org