________________
-१४८ : आराधना-कथाकोष
I
वारिसेनाचिया पुढे । हार टाकोनि लडवडे । होवोनिया एकीकडे । वृक्षा आडे लोपला ॥४५॥ चौरामागे राजकिंकर । पावले जेथे राजकुमर । ध्यान धरिले असे थोर । जैसा मेरु सुदर्शन ॥ ४६ ॥ हाराचे उद्योत करोन । तराळे पाहिला वारिसेन । म्हने राजमंदिर काय नून । कुमर म्हनून चोरी करति ॥ ४७ ॥ 1 जैसे ज्याचे पूर्वसंचित । तैसि बुद्धि आठवे त्यात ।
कोन्ही सेविति व्यसनसप्त । कोन्ही श्रावक व्रत नेम पाळिति ॥४७॥ दोघे बन्धु एक्या उदरि । जन्म घेती एके वासरि । एक आचारी एक नाचारी । यथा बदरिकंटकासम ||४९ ॥ उक्तंच । एकोदरे समुत्पन्ना एकनक्षत्रजातका | तथा शीलं समं नास्ति यथा बदरिकंटका ॥५०॥ जरी घरचा असे चोर । त्यासी धरावे कोठवर । रिक्त पाहोनि भांडार । उडवील शीर नृप आमचे || ५१|| ऐसा विचार करोनि मनि। त्वरे जावोनि राजभुवनि । निवेदन केले नृपालागुनि । तव पुत्र अवगुणि थोर असे ॥५२॥ दिवसा राज्यक्रीडा करि । रात्रौ स्मशानि ध्यान धरि । मध्याननिसि करिति चोरि । ग्रामांतरि नित्यप्रति ॥५३॥ तरालोक्त' ऐकोनि भूप । सर्वांगि प्रजलला कोप । म्हने पुत्र जन्मला पापरूप । कराव्या संताप कुटंबासी ||५४ || स्मशानी ध्यानधत हे कोठे । जेन्हे स्वर्गमोक्ष भेटे । सोडोनि कर्माचरिति खोटे । दुर्गति वाटे जावयासि ॥५५॥
१. कोतवाल.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org