________________
प्रसंग अकरावा । १४७
जरी उद्भवली असे व्याधि । ते नासीन क्षणामधि । जेन्हे करोन तव हृदि । सौख्यवृद्धि पावल ॥३३॥ तद्वाक्य ऐकोनि विलासिनि । वदे विद्युच्चौरालागुनि । श्रीकीर्तिश्रेष्टिचे कंठातुनि । रत्नहार आनुनि देसी मज ॥३४।। तरीच जानीन भ्रतार । प्रीति धरोनिया फार । आलिंगन देईन सत्वर । नानाप्रकार सौख्य भोगिसि ॥३५॥ जरी न देशी हार आणून । तरी तुजपेक्षा बरे श्वान । जो स्त्रियांचे न साधि काम । तो पशूहून नर निप्टारा ॥३६।। गणिकावाक्य ऐकोनि ऐसे । म्हने जे वस्तु विदिवि असे । ते मी आणीन भर्वसे । त्वा पाहिले कैसे मज निर्बल ॥३७॥ ऐकोनि वेश्याचे वचन । म्हने हार आनल्याविन । तुजप्रति न दावीन वदन । वृथा काय वाचून पृथ्वीवरी ॥३८।। जरी नारीचे मनोरथ । पूर्ण न करिति कांत । तो वाचला वर्ष बहुत । जानावा प्रेत तोचि नर ॥३९॥ ऐसे वदोनि विद्युच्चौर । पनज साघोनि सत्वर । निघता जाला सत्वर । श्रेष्टिमंदिरावर वेंधला ॥४०।। प्रवेश करोनि मंदिरात । तस्करविद्यासी साधित । ज्ञाने करोनि रत्नमालात । चालिला हस्तात घेवोनिया ॥४१।। रस्त्यामाजी येताचि तस्कर । हार उद्योत पडला फार । तराळे जानोनि निशाकर । करिति पुत्कार घोर शब्द ।।४२।। धरा रे धरा वदे वचनि । मागे लागले धाव घेऊनी । तस्कर घायबरा होउनि । गेला पळोनि नगराबाहिर ॥४३॥ पळत पळता निशाकर । मागे धावले राजकिंकर । जेथे उभा राजकुमर । गेला सत्वर त्या स्थानकी ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org