________________
१४६ : आराधना-कथाकोष
कोन्ही करोनि पाकनिष्पत्ती । येकयकासि बाहिति । षटु रस भोजन भुंजति । महाप्रीति येकमेका ॥२२॥ कोठे होती गायन । मिळोनि सेटे महाजन । करविताती नर्तन । होति कीर्तन ठाइ ठाइ ॥२३॥ ग्रामवासी पुरुषास्त्रिया। मिळाले असती त्या ठाया। भ्रतारचित्त रंजविति जाया। कितियक पाह्यालागि येति ॥२४॥ तदा त्या अवसरि । विलासिनि मगधसुंदरि ।। क्रीडा करिति नानापरी । संभूसित नारीपुरुष पाहती ॥२५॥ श्रीकीतिचे गळा । अमोल्य पाहिली रत्नमाला । तेज व्यापिले भूमंडळा । वेळोवेळी दृष्टि लाविति ॥२६॥ होवोनिया व्यग्रचित्त । विचार करि स्वचित्तात । म्हने धिक्कार असो मत । करंटी जगात मी जन्मलि ॥२७॥ या रत्नमालावाचुनि । सोभा नसे मद्भुवनि । तरी करावे काय वाचुनि । वदन या जनि काय दावावे ॥२८॥ मम मंदिराप्रति । स्वर्णशैपसि नसे गनती। परंतु हारारहित दिसति । दीनवृत्ती मम शारीरे ।।२९।। ऐसी विचारी चित्तात । होवोनिया फार दुःखित । स्वगृहा जावोनि त्वरित । पाहुडली फुदत स्वमंचकी ॥३०॥ तदा निशामाजी दोन प्रहर । तिचा जारज भ्रतार । येवोनिया विद्युच्चौर । पाहिलि मगधसुंदरि सत्त्वर । दुःखित फार निजमंचकी ॥३१॥ तस्कर पुसे तिज कारने । हे हे कांते चंद्रवदने । दुक्खित दिससि कौने गुणे । ते सांगणे शीघ्र मज ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org