________________
५.२
५.३
(८)
पावेतो क्रियाशील ठेवू शकतो ही गोष्ट पात्रकेसरीच्या कथानकावरून सिद्ध होते.
अकलंक स्वामी
अकलंक स्वामींचे चरित्रही (विस्मयावह) आश्चर्यकारकच दक्षिणेकडील आंध्र देशांत जन्म झाला. जिज्ञासावृत्ती गप्प बसू देईना म्हणून बौद्ध तत्त्वज्ञान व धर्म ह्याचा अभ्यास केला. त्यात लहान भावाचे बलिदान झाले तरी न डगमगता देशभर विहार करून वादविवाद करून धर्माची यशोपताका देशभर फडकत ठेवली. कोणताही धर्म असो त्यात काही चांगले मुद्दे असतात, काही वाईट असतात. त्यातील आपल्या धर्माच्या चांगल्या मुद्यांच्या प्रसारासाठी इतरांच्या धर्मातील वाईट मुद्यांच्या प्रसारासाठी इतरांच्या धर्मातील वाईट मुद्यांच्या किंवा उणीवांचा उपयोग प्रभावीसणे करून घेणे सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी ज्ञानाची अखंड उपासना, वाणीवर अधिकार लेखणीवर प्रभुत्व, समाजजीवनाचा सूक्ष्म अभ्यास, व सफल नेतृत्व आवश्यक असतात. ह्या सर्व गोष्टी अकलंकस्वामीमध्ये प्रकर्षाने एकत्रित झालेल्या दिसतात म्हणून काळाच्या चाळणीतून त्याचे वाङमय व स्मृती अक्षर ठरली.
समाजाच्या व धर्माच्या प्रसारासाठी वैयक्तिक सुखावर तुळशीपत्र ठेवावे लागते हे ओघानेच आले. ह्यातील वादविवाद जयामध्ये चमत्काराचा थोडा भाग घातला आहे. एकतर कथेच्या दृष्टीने तो आवश्यक असेल किंवा त्याकाळी झालेला वादविवाद कोणत्या मुद्यावर झाला. त्याचा पूर्वपक्ष वा उत्तरपक्ष कसा मांडण्यात आला व त्यात अकलंकस्वामीचा जय कसा झाला ह्याचे सामान्य विवरण ह्या चमत्कारकथेत दिसून येते.
सनतकुमार
गरीबी व श्रीमंती हा एक मानवामधील महान चमत्कार आहे. त्याचे स्पष्टीकरण वेगवेगळ्या धर्मांनी वेगवेगळ्या प्रकारे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org