________________
(७)
४.१२
४.१३
अरण्यातून भूतारण्य मधुबन व विंध्याचलबनाचा खास उल्लेख करावा लागेल. नद्यामध्ये गंगा, गंगाप्रवाह, गंगातट व गंगासंगम प्रसिद्ध आहे, नर्मदा व क्षिप्रा ही प्रसिद्ध आहे. गंगेची उपनदी म्हणून यमुना प्रसिद्ध आहे. वेगवती हे अचिरवतीचे दुसरे नाव असावे. सीता हे क्वचित् गोठणाऱ्या नदीचे नाव असावे. दक्षिणगंगा म्हणून प्रसिद्ध असणा-या गोदेचाही उल्लेख आला आहे. बेन्नातट शब्दाने वैनगंगा नदीचा काठ सूचित होतो. ती गोदेची उपनदी आहे. समुद्रामध्ये लवण प्रसिद्ध आहे. स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असणारे क्षीरोदधि व मोठ्या माशासाठी प्रसिद्ध असणारा स्वयंभूरमण विख्यात झाले. व स्मृतीत राहले. क्षीरोदधिचे स्मरण जिर्ने द्रजन्माभिषेकाच्या निमित्ताने लक्षात राहले. तर स्वयंभरमणापलीकडे मानवाचा संचार त्याकाळी होत नसावा असे दिसते.
५. काही कथांचे रसग्रहण पात्रकेसरी ___ अन्तर हे नेहमीच त्रासदायक असते. मग ते काळातील असो की स्थानातील, भाषेतील असो की मनातील. त्यामुळेच ते लोकांच्या चिरकाल स्मरणात राहते. पात्रकेसरी हा मूळचा ब्राह्मण भरतखंडात जन्मलेल्या ब्राह्मणापासून पृथ्वीवरील सर्व मानवांनी आपापली वागणक निश्चित करावी ह्या परंपरेतला. तोही जिज्ञासू वृत्तीमुळे एका ठिकाणी अडखळतो व मतपरिवर्तनाला वा धर्मपरिवर्तनाला तयार होतो. त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे इतरांनाही बदलवितो. त्यामुळे ही घटना काळाच्या ओघात जनमानसात शिल्लक राहली हे दिसते. वारसाहक्काने मिळालेल्या अधिकारापेक्षा स्वकर्तत्वाने मिळविलेला अधिकार माणसाला अधिक प्रिय असतो व त्याला पुष्कळ काळ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org