________________
५.४
(९)
दिले आहे. विषमता आहे मग ती हटवायची कशी ? ती हटविण्याचे दोन प्रकार. गरीबांनी जबरदस्तीने श्रीमंती कमी करायची किंवा श्रीमंतांनी आपणहून गरीब व्हायचे, ह्यातला एक प्रकार बंद झाला की दुसरा सुरू होणार. हा निसर्ग नियम आहे. प्राचीनकाळी श्रीमंत लोक नित्यनियमाने अधून मधून गरीबीचा उपभोग घेण्यास आपखुशीने तयार होत हा इतिहासाचा दाखला आहे. चक्रवर्ती हा माणसामधला सर्वांत श्रीमंत माणूस, षट्खंड पृथ्वीचे राज्य, चतुर्शश रत्नाची प्राप्ती, ८४,००० हत्ती, १८ कोटी घोडे, ८४ लक्ष रथ, ८४ कोटी पायदळ, ९६ कोटी गावे (खेडी), ९६,००० सत्रिया, १२,००० म्लेंच्छभूप मांडलिक, ३२००० हजार राजे सामंत अशा प्रकारे त्यांच्या वैभवाचे वर्णन करतात. तो माणूस जेव्हा अंगावर चिंध्याही ठेवत नाही, भिक्षा मागून अन्न मिळवितो ( दिवसातून एकदाच ) आकाशाला निवारा मानतो व ज्ञान व निर्भयता ह्याचे वितरण करीत हिंडतो तेव्हा कुणाचे मन हेलावणार नाही ? सामान्य माणसाच्या मनातून क्रांतीचे बीज नष्ट करण्याला ही गुप्त आत्मक्रांतीच तर कारणीभूत नसेल असे वाटते. ही गोष्ट सनत्कुमाराच्या कथेत लोकांच्या मनःपटलावर कायम कोरून ठेवायला निमित्त झाली असेल.
समंतभद्र
समंतभद्राचा जन्म तमिळमध्ये झाला. शैव, वैष्णव व जैनांचे सारखेच प्रभुत्व असणाऱ्या कांचीमध्ये त्यांचे बालपण गेले. परंतु आपल्या प्रतिभेने त्यांनी सारा भारतवर्ष उजळून टाकला. जीवनाचा पाव भाग ज्ञानसंपादनात, पाव भाग रोगाशी झगडण्यात व अर्धा भाग वादविवाद, शास्त्रचर्चा, ग्रंथरचना, धर्मोपदेश ह्या सारख्या महान गोष्टीत घालविला. त्यांच्या स्मरणाविना जैन इतिहास अपूर्व रहावा ह्यात काही आश्चर्य नाही. आकाशामध्ये सूर्यचंद्रानंतर बृहस्पतीचे स्थान आहे त्याप्रमाणे महावीर सूर्य, कुंदकुंद चंद्र तर समंतभद्र गुरू म्हणून खासच शोभतील. शैवा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org