________________
प्रसंग दहावा : १४१
कोल्हाल ऐकिला श्रेष्टिन | अपला स्वामि वोळखून । सोयगूहनांगरक्षण | बोले वचन ग्रामिकासि ॥६९॥ रे रे मूर्ख दिसता तुम्हि । महातपस्वि आमचा स्वामी । तस्कर म्हणता दुष्टकर्मी । जावे स्वधामि अपुलाले ॥७०॥ आम्हिच आनविले रत्न | आणून दिधले स्वामिन । श्रेष्टिचे ऐकोनि वचन । सत्य मानोन गेले सर्व ॥ ७१ ॥ तेव्हा त्या ब्रम्हचारिसि । बैसवोनि एकांतासि । विपरित बुद्धि तुजसि । झालि नर्कासि जावया ॥ ७२ ॥ श्रावकजन्मास येवोनि । लोभ द्रव्याचा धरोनि । तस्कराचि करिति करनि । ते नर्क खानि भोगितिल || ७३ ॥ तीन चिन्ह विसरून । रत्न नेतोसि चोरोन । तुला स्वामि म्हने कोन । पापि दुर्जन चोर खरा ||७४ || दिक्षा घेवोन जे प्राणि । द्रव्याचा लोभ धरिति मनि । न करि पुण्याची करणि । यमाचि जाचनि तयासि ॥ ७५ ॥ ऐसे जानोन भव्य जीव । सप्तक्षेत्रि धन खर्चाव | जन्माच सार्थक कराव । मणि धराव गुरूपाय ||७६ || ब्रह्मचारि ज्ञानवंत । श्रेष्टिचे वाग्बाण समस्त । लागले तयाचे हृदयात । पश्चात्ताप करितसे ॥७७॥ म्हने म्या बर नाहि केले । हातच रत्न गमाविले । म्या पाप होते योजिले । ते फलासि आले माझें मज ||७८ || धन्य धन्य जिनधर्मं । धर्मात्मा श्रेष्टि उत्तम ।
म्या योजिले खोटे कर्म । धिक् जन्म मी पापरासि ॥ ७९ ॥
करीत महत्पश्चात्ताप । अपनिंदा देहसंताप । म्हने पापाचा झाला व्याप । वज्रलेप मम जिवा ॥८०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org