________________
१४० : आराधना कथाकोष
कुमंडल सौच्यासाटि । जीव पाहोनिया दृष्टि । पिच्छी संग्रहली मुष्टि । दया पोटि धरोनिया ॥५७॥ जग उपदेशा कारण । पुस्तकसंग्रह करण । तीन रत्न करावि जतन । दर्शन ज्ञान चारित्र पै ॥५८॥ ऐसे श्रेष्टिन ऐकिले । तयाच मन संतोसले । मग ब्रह्मचारिसि बोले । हस्तयुगुल जोडोनिया ।।५९।। स्वामिराज दया करून । रत्नबिंबासि रक्षण करन । आम्हासि असिर्वाद देन । सर्व स्वाधीन केले त्याचे ॥६॥ क्षुल्लक हर्षला अंतरि । श्रेष्टिस म्हणे यावे लौकरि । विजयी व्हावे सर्वपरि । निघावे सत्वरि सुमुहूर्त ॥६१॥ मग सर्वासि पुसोनिया । नमन केले गुरूपाया। बि-हाडासि जावोनिया । तया ठाया विश्रामले ॥६२॥ सर्व मेळा जव मिळाला । चार दिवस मुकाम झाला । धीर न धरवे क्षुल्लकाला । संधी सापडला तयासि ॥६३॥ रात्र झालि माध्यान । रत्नबिंब घेतला त्यान । त्वरा निघाला मंदिरातून । नीट रस्तान चाले चंचळ ।।६४॥ रत्नाचा प्रकाश पडला । कोटपाल देखता झाला । धरा म्हनति चोर चालला । पळू लागला तो तस्कर ॥६५॥ पाठिसि लाग केला त्यानि । धरा म्हनति सर्व मिळोनि । घाबरला निर्बल चरनि । तव बिहाड नयनि देखिले ॥६६॥ त्वरा सिरला बिहाडात । तेथे सेटि देखिला अवचित । रत्न होते तेजे काखेत । दिधले तयात झडकरि ॥६७।। म्हणे मी शरण तुम्हासि । आता रक्षावे मम प्राणासि । कोटपाल म्हने तयासि । तुम्हापासि चोर आला ॥६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org