________________
१४२ : आराधना - कथाकोष
आता तारि श्रावकराया । दीक्षा घेतलि नाहि सखया । वेश धरोनि तुझिया ठाया । चोरी कराया आलो होतो ॥८१॥ ते मी पावलो पापकारण | आता मजवरि कृपा करून । सांगावे पुण्याचे कारण । जेणे पापदहन होईल ॥८२॥ श्रेष्ठि दयेचा सागर । सांगे धर्माचा विचार । तीर्थयात्रा करि सत्वर । जेणे संव्हार पाप सर्व ॥ ८३ ॥ ऐकोनि श्रेष्ठीचे वचन । त्वरा निघाला तेथोन । त्रिशुद्ध दीक्षा घेवोन । तीर्थगमन विहार करी ॥ ८४ ॥ क्षुल्लक गेलियानंतर । श्रेष्ठी मनी करी विचार । म्हने अनित्य हा संसार । वैराग्य अंतर उद्भवले ||८५ || विचारि द्वादस आनुप्रेक्षा । चोथ्या आश्रमी घेवोनि दीक्षा । अष्टकर्माचि करोनि रक्षा । अनुक्रम मोक्षा जाइल ॥८६॥ ऐसे जानोन भव्यजन । दर्शनाचे अष्टगुण । सोपगूहणांग करा पालन । स्वर्मोक्ष ज्याने प्राप्त होय ॥ ८७॥ एकांग पाळिले ज्या नर । त्याची कीर्ति पुराणांतर । अष्टांग पाळि शक्तिसार । त्या मोक्षमाहेर सर्व सुख ||८८|| द्वयपानि जोडोनिया । शीष विनवि गुरूराया । हेचि द्यावे कृपा करोनिया । शांति दया सदा असो ॥ ८९ ॥ काव्य - विमलतरजिनेंद्र प्रोक्तमार्गेऽत्र दोषं ।
वदति विगतबुद्धिर्यस्तु सोस्ति प्रमत्तः ॥ अमृतरससमानं शर्करादुग्धपानं ।
कटु भवति न किंवा दुष्टपित्तज्वरीणां ॥ ९० ॥ जिनधर्म श्रेष्ठ शुद्ध निर्मळ । निर्दोष मार्ग सूर्य केवळ । प्रमादी मिथ्यात्वी लाविता मळ । धर्मवंत सकळ झाकिजे ॥९१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org