________________
१३२ : आराधना-कथाकोष
क्षुल्लक मायाकरोनि युक्त । राज्ञीचे सर्व मंदिरात । दुर्गध सर्व महीत । जन लोकात अतिदुस्सह ॥१३७॥ ऐसे पाहोनिया राज्ञी । हाहाकार करिति वदनि । म्हने मी असे पापिनि । ममान्न म्हनोनि नाहि पचले ॥१३८॥ त्वरे घेवोनि उष्णनीर । पक्षाळिले तश्शरीर । पुन्हा वांत केले दुर्धर । दुर्गध फार गृहि व्यापिला ॥१३९॥ पुनःपुन्हा वांत करिति । तव तव राशि दुःखीत होती । म्हने याचे दुःखाची निवृत्ति । देवा जिनपति कैसि होइल ॥१४०॥ राज्ञिचि दृढ भक्ति पाहून । मायाकृत्य घेतले आवरूण । विघटिले समवशरण । क्षुल्लकान क्षणामाजि ॥१४१॥ मायावेश करोनि दूर । व्रतीरूप धरिले मनोहर । तत्प्रसंसा करी वारंवार । म्हने धन्य सार तव दर्शन ॥१४२॥ देवी तव रत्न सम्यक्त्व । त्रिजगि असे महांत । त्वद्गुणवर्णन कराव्यात । जन लोकात ज्ञान नसे ||१४३॥ देवि सुगुप्ताचार्य मुनिन । कृपासागर पुण्यपावन । धर्मवृद्धि तुजकारण । कथिलि जेन नासे पातक ||१४४॥ क्षुल्लक वाक्य ऐकोनि राज्ञी । मस्तकि जोडोनिया पानि । परोक्षवंदना केली तच्चरणि । म्हने पुण्यपावनि मी आज झालि १४५ दया करोनि मजवर । धर्मवृद्धि पाठविलि सार। मद्भाग्यासि नसे पार । पृथ्वीवर गुरुराया ॥१४६॥ त्वत्परीक्षा कराया कारन । म्या रचिले समवशरण । ब्रम्हाविष्णुवृषवाहन । तरि तव मन नाहि चळले ॥१४७॥ मी होवोनि माया ब्रम्हचारी । वमन केले तुजवरि । छलना केली बहुतापरी । न चळले तरी तव मन ॥१४८||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org