________________
प्रसंग नववा । १३१ त्रिलोकिचे देविदेव । मिळोनि करिति महदुच्छाव । हृदइ धरोनि थोरभाव । जयजयारव वदति मुखे ॥१२५।। राज्ञी म्हने रे मूढमति । तीर्थंकर चतुर्विंशति । होवोनि गेले या जगति । ते सर्वहि जानति सुर नर ॥१२६।। द्विषड्भेद चक्रेश्वर । नारायण नव हलधर । होवोनि गेले एकादश रुद्र । नारद उग्र झाले नव ॥१२७॥ पंचविसावा जिनपति । कोठोनि उद्भवला या क्षिति । कोन्हि नर यवोनि दुर्मति । मायाजाल दाविति मूर्खजना ॥१२॥ मग दूत जावोनि माघारा । वदता झाला नृपवरा । राज्ञिवाक्यवृत्तांतसारा । ज्ञान आधारा जो वणिला ॥१२९॥ दृढ सम्यक्त्व पाहोनि क्षुल्लक । म्हने हे जगी असे भाविक । इज वंदिति तीन लोक । सुरनायक गुण वणिती ॥१३०॥ तदा विघटोनि मायाजाल । पुन्हा विद्याचिय बल । व्रतीरूप धरिले तत्काल । तपतेजे निर्मल कृशांगि दिसे ॥१३॥ दुष्टव्याधि करोनि ग्रस्त । व्रणस्फोट करोनि पीडित । मक्षिका जाल वेष्टित । दुर्गंध महंत न साहे जन ॥१३२॥ चर्यावेला रेवत्यांगणे । आला भुक्ति कराव्या कारणे । मूर्छा यवोनि तत्क्षणे । पडोनि वदनेन वदि वाक्य ॥१३३॥ भूमीगत पाहोनि यती । धावत आली राज्ञि रेवति । वदने हाहाकार करिति । म्हने हा यति थोर दुःखित ॥१३४॥ करुणा हृदइ आणून । शीतवातोपचार करून । प्रती केला सचेतन । गेली घेवोन स्वमंदिरि ॥१३५॥ मग शुद्ध प्राशुक आहार त्यासि । देती झालि मनोह्लासी । पुर्णादर करोनि आहारासि । केले वांतासि राजीवरि ॥१३६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org