________________
१२६ : आराधना-कथाकोष
कापटय धरोनि हृदयात । सर्वभूमि केलि हरित । मृदु अंकुर जीवयुक्त । ते तृण मर्दित चालिला मुनि ॥५८॥ तदाणुव्रति वदे त्यासि । हरिततृण जीवरासी । ते मर्दन करिता कैसी । होय पापरासी जीवघाते ॥५९॥ पढोनि द्वादशांगशास्त्र । उच्रस्वरे पठिता सूत्र । लोकासि मोहिता दिनरात्र । हे नव्हे अपवित्र मुनि क्रिया ॥६०॥ ऐसे ऐकोनि भव्यसेन । म्हणे कोठे शिकलासी ज्ञान ।' मज सांगतोसि शाहाणपन । नसता ज्ञान लवमात्र ॥६१॥ मग भूमि जावोनिया दूर । बैसला तो मुनिश्वर । कुंडी माजी न दिसे नीर । फुफुकार करि तदा ॥६२।। मग अणुव्रति वदे मुनि । जल घालिता विसरलो मी या सरोवरी असे पानी । तेथे जावोनी क्षालन करा ॥६३।। ऐसे वदोनिया त्यात । विद्याबले करोनि व्यक्त । जल केले दूसित । टलवलीच जीवरासी ॥६४॥ मग जावोनिया भव्यसेन । करिति गुदप्रक्षालन । न जाने षट्कायजीवरक्षण । दयाहुन रहित असे ॥६५।। अणुवति पाहोनि क्रियाभ्रष्ट । पापाचारि आचारनष्ट । उपदेस सांगोनि वरीष्ट । जगि श्रेष्ठ झाला असे ||६६।। तदा वदे जनाहीकारण । न करावे यासी नमन पूजन । हा क्रियाभ्रष्ट आचारहीन । करिती कारण दुर्गतीचे ॥६७।। भव्यसेन न वदावे यासी । सम्यक्त्व नसे याजपासी। अभव्यसेन अभिधान यासि । पापिष्टासि वदावे तुम्हि ॥६८॥ जनासि वदोनि ऐसेपरि । तेथोनि चालिला सत्वरि । गेला उत्तरमथुरानगरी । गावाबाहेरि तिष्टला ॥६९।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org