________________
प्रसंग नववा । १२५ स्वामी आनीक कौना कारणे । जरी काहि असे सांगने । ते शीघ्रकरावे निरुपने । मज कारणे पुण्य पावन ॥४६॥ ऐसे पुसिले तीन वार । मग न वदे मुनिश्वर । तत्क्षणि करोनि नमस्कार । चालिला विद्याधर क्षुल्लक ॥४७॥ तीर्थवंदना करित चालिला । उत्तर मथुरा प्रति आला। तेथे सुव्रताचार्य पाहिला । नमस्कार केला तत्पंकजि ॥४८॥ तपतेजे जैसा सूर्य । महाज्ञानिमुनिराय । शुद्धभावे वंदिले तत्पाय । जेन्हे पाप जाय भवभवीचे ॥४९॥ मग वदे श्री गुरुस्वामी । दक्षिण देसी असे गुप्ताचार्य मुनि । त्यान्हे नती तुम्हालागुनि । कथिलि भक्ति करोनिया ॥५०॥ ऐकोनि क्षुल्लकाचे वचन । सुव्रताचार्याचे हर्षिले मन । क्षेम कुशल तयालागुन । पुण्यपावन पूसिले ॥५१॥ क्षुल्लिके सांगोनि समाचार । मुनिदयाचा सागर । वदोनि चालिला देशावर । करिता पार तीर्थवंदना ॥५२॥ ज्या देसी असे प्रख्यात । पूजनीक सर्व जनात । भव्यसेन नामत्यात । ज्ञानवंत द्वादशांगपाठी ॥५३॥ माननीक असे सर्व जनि । परंतु ज्ञानमद त्या लागुनि । असे रहित सम्यक्ताऊनि । बक ध्यानि दिसतसे ॥५४॥ ऐसी पाहोनिया रीति । क्षुल्लक विचार करिचित्ति । म्हणे पाहु यत्प्रचीति । मुनिने नति का न कथिलि |॥५५॥ राहोनिया त्याजपासी । सेवा करि दिन निसि । तत्परीक्षा पाव्हायासि । कापटय मानसी धरियले ॥५६॥ येकदा बहिर्भूमिकारणा । चालिला तो भव्यसेन । मागेकुंडिका घेउन । कापट्यमन चाले नुवति ॥५७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org