________________
१२४ । भाराधना कथाको अहो सद्गुरु श्रावक व्रत । क्रिया वदावि मज मूढातं । ऐकोनि करीन आत्महित । जेन्हे होईल प्राप्त सौख्यरासी ॥३४।। तद्वाक्य ऐकोनि शुद्ध । कथिले व्रताद्विषट्भेद । श्रवणे उद्भविला प्रमोद । यथानंद दरीद्राधने ॥३५॥ पुन्हा एकादश प्रतिमाचे । भेद कथिले मुनींद्र वाचे । पृथविध भेदभाव त्याचे । आचरिता स्वर्गाचे राज्य मिल ॥३६।। गुप्ताचार्या मुनिराया । भेद कथिले त्रिपन क्रिया । विद्याधरे ऐकोनिया । हर्ष हृदया फार धरिला ॥३७॥ म्हने हे त्रिपन क्रिया व्रत । योग्य असे पालाव्यात । आता घ्यावे अणुव्रत । करावे हित पाळोनिया ॥३८॥ मग ऐसे विचारि मानसि । नती करोनि गुरुचर्णासि । अणूव्रत घेतले मनोह्लासि । पुढे सौख्यासि प्राप्त व्हाया ॥३९॥ पूर्वी विद्या होत्या साधिल्या । ते सानिज स्वास्पदा गेल्या स्वामीविना दुःखीत झाल्या । करु लागल्या शोकांतरि ॥४०॥ मग त्या चंद्रप्रभ क्षुल्लकान । येक विद्या ठेविली जान । चमत्कार जगासि दावन । कराव्या कारण जनोपकार ॥४१॥ मग कौने येके दिवसि । वदे आनंदे सद्गुरुसि । विहार उपदेश जगासि । तीर्थयात्रेसी जातो अता ॥४२॥ गुरुपदि करोनिया नति । पुसे गुत्पाचार्य मुनिप्रति । कथिता काहिक वनाप्रति । पुण्यप्राप्ति व्हावयासि ॥४३॥ क्षुल्लक वाक्य ऐकोनि ऋषि । म्हने सुव्रताचार्यासी ॥ मन्नुति सांगावे मनोह्लासि । करकमलासि जोडोनिया ॥४४॥ स्वामी आनीक कौनासहि । पुण्यवार्ता सांगता काही । मुनि म्हणे रेवति रानीसहि । वदावे लवलाहि मम धर्मवृद्धि ॥४५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org