________________
प्रसंग नवबा । १२३
मंग चालिला तेथोनि । गिर्नारपर्वतावरि जाऊनि । नेमिजिनेश्वर चरणि । हृदि भाव धरोनि वंदिले ॥२२॥ सप्तशत बाहात्तर कोडीयति । कर्म क्षय करोनि गेले मुक्ति । थोर महिमा असे त्रिजगति । भव्यजन जाति नित्य तीर्था ||२३|| नेमीजन बाल ब्रह्मचारी । त्रिलोकि महिमा जयाचि थोरि । सिद्ध झाले उज्झतगिरि । यात्रा दूरिदूरिचि येति ॥ २४ ॥ तेथे वंदना करोनि खग मग तेथोनि चालिला वेग । मांगितुंगिनग पाहिला द्विभाग । तेथे मनरंग केलि वंदना ||२५|| जेथे फार मुनीराज । तपे साधिले आत्मकाज । पावते झाले अचल राज | सिद्धिभाज पणिलि ॥ २६ ॥
1
ते तीर्थजग असे विख्यात । इंद्रादिक येति वंदनेत ।
भव्यजन कराव्या आमहित । येति नित्य पूजा करावया ||२७|| तेथे जेथे निर्वाण भूमि । नन्यानऊ कोडी गेले मुनि ।
वंदना करोनि त्यास्थानि । मग तेथोनि निघाला ||२८||
मग चालला तेथुनि । मेंढगिरिवरि येऊनि ।
आऊटकोडि निर्वाण पावले मुनि । ते वंदिलि भूमि भक्तिभावे २९ तीर्थवंदना करिता ऐसी । येता झाला दाक्षिणदेसि । तेथे गोमटदेवासि । आनंदमानसि वंदिले ||३०||
मग येवोनि दक्षणमथुरा । तेथे गुप्ताचार्य मुनीश्वरा । पंचांग नमन केले त्वरा । संसार सागरा उत्नावया ॥३१॥ मग बैसोनि तया पुढे । धर्मोपदेश ऐकति गाढे । जेन्हे पूर्विचे पाप झडे । मार्ग सापडे मुक्तिचा ||३२|| त्या चंद्रप्रभ खगाने भलि । मुनीक्रिया आईकेलि । हृदइ प्रीत उद्भवली | मग केलि पुन्हा विनवनि ॥ ३३ ॥
।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org