________________
१२२ : आराधना-कथाकी
बैसोनिया विमानावर । सम्मेदसिखरि गेला सत्वर । वंदिले वीस जिनेश्वर । केलि पूजासार अष्टविध ॥१०॥ तदनंतर केली स्तुति । अत्यंत धरोनिया भक्ति । जे हे कोटी जन्माचे पाप हरति । स्वर्गमुक्ति सौख्यदाई ||११|| आइका सम्मेदसिखराचि महिमा । भाव धरोनि गरिमा । जो नरकरे पूजाबंदना । न पाहे दुर्गतिरामा त्याजकडे ||१२|| त्याचे वर्णन करिता । सुरगुरुसि नाहि साम्पता । जेथें वीस जिनेंद्र कर्महंता । मुक्तिपंथा गेले असति ॥ १३॥ कोटयावधि मुनिश्वर । तपाचरण करोनि घोर । झाले मुक्तिचे भ्रतार । अपरंपार सौख्य भोगति || १४ || ऐसे जानोनि भव्यजन । महत्भक्ति भावे करोन । नित्य करावे वंदन पूजन । जेन्हे कर्माचि हान होईल ॥ १५ ॥ पुन्हा वंदना करोनिया । स्वविमानि बैसोनिया । चंपापुरासी जावोनिया । वासुपूज्य जिनराया वंदिले ||१६|| ज्यास्थळ पंचकल्याणिक | पावले श्रीजिननायक । ते तीर्थं त्रिजगि वंदनीक | सौख्य दायक भव्य जन || १७ || मग तेथोनि निघाला । पावापुर नगरासि आला । भावे महावीर वंदिला । हृदइ पावला थोर हर्ष ॥ १८ ॥ तेथोनि चालला सत्वरि । येता झाला कैलाससिखरि । स्वर्ण चैत्याल्या भीतरी । रत्नबिंब नेत्रि पाहिले ॥ १९ ॥ करोनि त्रिविध प्रदक्षणा । कृतसाष्टांग वंदना | द्रव्य घेवोनिया नाना । श्रीजिनचरना पूजिले ॥२०॥ जेथे आदीजिनेश्वर । निर्वानपद पावले सार । त्या तीर्थाचि महिमा अपार । होति दूरकर्मरासी ॥२१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org